अकोला: दिनांक २७ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११.३० वा विजय हॉल पोलीस अधीक्षक कार्यालय येथे, अकोला पोलीस दल व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था व जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य विभागाचे सर्व तालुका आरोग्य अधिकारी पोलीस विभागाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्याकरिता कोटपा कायदा (तंबाखू व तंबाखूजन्यपदार्थ प्रतिबंधित कायदा २००३) संबंधित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर ची कार्यशाळा ऑन लाईन व ऑफ लाईन पध्दतीने घेण्यात आली.
सदर कार्यशाळा जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री. बच्चन सिंग यांच्या अध्यक्षते खाली पार पडली याप्रसंगी श्री आप्पासाहेब उगले सदस्य सचिव तथा प्रकल्प संचालक मराठवाडा ग्रामीण विकास संस्था छत्रपती संभाजीनगर यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थीना कोटपा कायद्यासंबंधीत सविस्तर मार्गदर्शन केले व कायदा अंमलबजावणी करिता येणा-या अडचणी बाबत चर्चा केली तसेच जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाच्या जिल्हा सल्लागार डॉ. प्रीती कोगदे यांनी प्रस्तावित केले तसेच सध्याचे तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवना बाबत महाराष्ट्राची आकडेवारी बाबत डॉ. निकिता गायकवाड यांनी माहिती दिली आभार प्रदर्शन व उपस्थितांना तंबाखू विरोधी शपथ जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाचे जिल्हा समुपदेशक धम्मसेन शिरसाट यांनी दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोहवा गोपाल मुकुंदे यांनी केले.