
अकोला: दि.23/08/2024 रोजी पीडीत चे वडील/फिर्यादी यांनी पोलीस स्टेशनला पिडीतसह येवुन रिपोर्ट दिला की त्यांची मुलगी पिडीता हिने त्यांना माहीती दिली की, तिचे नात्यातील तिचे वडीलांचा मामे भाउ नामे यश युवराज गवई वय 20 वर्षे याने पिडीत हिला धमकावून तिचे सोबत वारंवार लैंगिक अत्याचार केला अशा प्रकारे पिडीताने तिचे वडीलांना दिलेल्या माहीती वरून फिर्यादी यांनी पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिल्यावरून पोलीस स्टेशन अकोट फाईल येथे भारतीय न्याय सहीता कलम 64, 64 (2) (एफ) (एम), 65, (2), 333, 351(2) (3), तसेच बाल लैगिक अत्याचार कायदा कलम 4, 5 (एल) (एम) (एन), 6 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर गुन्हयातील आरोपी नामे यश युवराज गवई वय 20 वर्ष रा हिंगणा तामसवाडी ता.जि अकोला याला तात्काळ अटक करण्यात आली असुन मा. पोलीस अधिक्षक साहेब, अकोला, अपर पोलीस अधिक्षक साहेब तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अकोला यांचे मार्गदर्शनात गुन्हयाचा तपास म.स.पो.नि. चंद्रकला मेसरे या करीत आहेत.