स्वातंत्र्य दिनाच्या होर्डिंवर राष्ट्रपुरुषांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो डावलणाऱ्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या विरोधात वंचित युवा आघाडीने केला निषेध

तिवसा/
काँग्रेस पक्षाचे वतीने स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देणारे लावण्यात आलेल्या होर्डिंगवर राष्ट्रपुरुषांमध्ये राष्ट्रनिर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो वगळल्याने वंचित बहुजन युवा आघाडीचे वतीने जिल्हा महासचिव सागर भवते यांच्या नेतृत्वात आज शहरातील पेट्रोलपम्प चौकात तीव्र निदर्शने करून काँग्रेस पक्षाचा निषेध करण्यात आला.
भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारत देशाच्या जडणघडणीत मोठे योगदान असून देशात समताधिष्टीत लोकशाही केंद्रीत व्यवस्था निर्माण करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले आयुष्य खर्ची घातले आहे. परंतु काँग्रेस पक्षाच्या आमदार यशोमती ठाकूर यांचे वतीने स्वातंत्र्यदिनाच्या होर्डिंगवर इतर राष्ट्रपुरुषामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटो चा समावेश केला नाही हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान असून यातून काँग्रेसचा जातीयवादी चेहरा पुन्हा उघडकीस आला असल्याचा आरोप वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांनी केला आहे. तिवसा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून सर्व कार्यकर्त्यांनी पेट्रोलपम्प चौकात एकत्र येत काँग्रेस पक्षाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करून निदर्शने दिली. स्वातंत्र्यदिनाच्या हिर्डिंगवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो वगळल्याने आंबेडकरी जनतेमध्ये तीव्र संताप असून हे जाणीवपूर्वक जातीय मानसिकतेमधून केलेले कृत्य आहे. तेव्हा होर्डिंग वर शुभेच्छा देणाऱ्या खासदार बळवंत वानखडे व आमदार यशोमती ठाकूर यांनी समस्त आंबेडकरी जनतेची माफी मागावी अशीही मागणी यावेळी आंबेडकरी कार्यकर्त्यांनी केली.
निषेध आंदोलनात यावेळी जेष्ठ नेते सतीश यावले, जिल्हा सदस्य प्रशांत गजभिये, विनय बांबोळे, शैलेश बागडे, अमोल जवंजाळ, राजू शापामोहन,मनीष खरे, बबलू मुंद्रे, दादाराव गडलिंग, गुणवंत ढोणे, सचिन जोगे, महेश दहाट, विनोद खाकसे, धिरेंद्र थोरात, राहुल मनवर, सदानंद घायवट, गोवर्धन मेश्राम, किरण खाकसे,रोषण ढोणे, दिनेश कांबळे, सह कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.