अकोला जिल्ह्यात कॉग्रेसला मोठा हादरा…
कॉग्रेसचे माजी जिल्हा महासचिव तथा विद्यमान जि. प. सदस्य चंद्रशेखर चिंचोळकर यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहिर प्रवेश.

अकोला – वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कॉग्रेसचे माजी जिल्हा महासचिव तथा विद्यमान जि. प. सदस्य चंद्रशेखर चिंचोळकर यांनी आपल्या समर्थकांसह यशवंत भवन अकोला येथे श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या शुभहस्ते वंचित बहुजन आघाडीत जाहिर प्रवेश केला. ओबीसी आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसींच्या पाठीशी या महाराष्ट्रत एकमेव नेता उभा राहिला. ते म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर. आज ओबीसींच्या आरक्षणाला टिकवण्यासाठी सर्व ओबीसी बांधवांनी श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी उभे राहायला हवे. आम्ही ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीत जाहिर प्रवेश केला असल्याचे यावेळी चंद्रशेखर चिंचोळकर यांनी सांगितले. चंद्रशेखर चिंचोळकर यांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यात कॉग्रेसला मोठा हादरा बसला असुन वंचित बहुजन आघाडीला मोठे पाठबळ मिळाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.