व्याळा ग्रामपंचायत सरपंच यांनी व्याळावाशी यांचे निवेदन न स्वीकारताना समस्यावर फिरवली पाठ

वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी सरपंच यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे करणार तक्रार.

अकोला:व्याळा… व्याळा ग्रामपंचायत अंतर्गत संपूर्ण गावामध्ये अगदी समस्याचा ढिगच ढिग लागलेला आहे. गावातील पाणी रस्ता नालीसफाई लाईट इत्यादी मूलभूत गरजा पूर्ण करण्यास सरपंच व ग्रामपंचायत व्याळा असमर्थ ठरलेली आहे. म्हणून या आंदोलनामध्ये जागरूक व कर्तव्यदक्ष ग्रामपंचायत सदस्य सुद्धा सहभागी झाले होते. यामध्ये प्रामुख्याने उपसरपंच पती शेख अशपाक शेख अयुब ग्रामपंचायत सदस्य उज्वल अंभोरे श्रीकृष्ण सोळंके सुरेंद्र दामोदर स्वप्नील वानखडे यांनी आपला सक्रिय सहभाग नोंदविला त्याबद्दल आंदोलकांनी सुद्धा त्यांच्याबद्दल समाधान व्यक्त केले परंतु सरपंच श्री गजानन वजिरे यांना सर्व कल्पना व माहिती असून व दुपारपर्यंत उपस्थित राहून सुद्धा जाणीवपूर्वक आंदोलकाचे निवेदन स्वीकारणे मान्य न करता अकोला येथे निघून आले त्यानंतर पोलिसाद्वारे माझी तब्येत बरी नसल्याचे सांगून आपल्या कर्तव्यावर कसूर करून व्याळा गावाशी यांचे निवेदन स्वीकारता त्यांच्या समस्यावर पाठ फिरवली त्यामुळे संपूर्ण व्याळा गावांमध्ये सरपंच यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत सविस्तर असे की दिनांक 13 /8 /2024 रोजी वंचित बहुजन आघाडी व्याळा च्यावतीने गावातील खालील समस्या पूर्ण करण्याकरिता एक दिवशीय धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये आज पावसाळ्याचे दिवस असल्याने संपूर्ण गावात नळ योजनेद्वारे जी पाईपलाईन टाकली ती पक्के रस्ते फोडून टाकल्याने गावांमध्ये संपूर्ण चिखलाचे साम्राज्य आहे गावामध्ये चालणे सुद्धा कठीण झालेले आहे व पाण्याचे डबके साचलेले यामुळे रोगराई होण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर गावात लाईट नसल्याने साप व यासारखे सरपटणारे प्राणी सुद्धा अंधारामध्ये दिसत नसल्याने शाळकरी मुलं वयोवृद्ध व शेतकरी व शेतमजुरांना त्रास सहन करावा लागते म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने खालील मागण्या पूर्ण करण्यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.

  1. एक नळ योजनेसाठी खोदलेले खड्डे त्वरित सिमेंट काँक्रिटीने बुजवणे व ज्या संस्थेने काम केलेले आहे त्या संस्थेचे नाव काळे यादीत टाकण्यासाठी 15 ऑगस्ट च्या ग्रामसभेत ठराव पारित करावा.
  2. 15 ऑगस्ट 2024 ची ग्रामसभा ही आठवडी बाजारामध्ये घेऊन संपूर्ण गावाला निमंत्रित करून आजपर्यंतचा विकास कामाचे वाचन करावे.
  3. सन 2022 ते 2024 पर्यंतचा ग्रामपंचायतचा अंकेक्षण अहवाल जनतेसमोर सादर करावा.
  4. गावातील बंद असलेले स्ट्रीट लाईट त्वरित सुरू करून प्रत्येक खांबावर एलईडी लाईट लावण्यात यावी.
  5. गावातील नालीसफाई करिता नियमित सफाई कामगारांची नियुक्ती करावी.
  6. 3 नोव्हेंबर 2023 च्या ग्रामसभेतील प्रस्तावित कामांना मंजुराची देऊन प्रस्तावित कामे पूर्ण करण्याकरिता निधी उपलब्ध करावा.
  7. हायवेवर होणारे अपघात थांबविण्यासाठी गावातील शेतकरी यांना आपल्या शेतात जनावरे व शेती उपयोगी साहित्य नेण्यासाठी देगाव रोडवर व खिरपुरी रोड दुभाजकाजवळ हायवेवर अंडरपास देण्याकरिता ग्रामसभेमध्ये ठराव घेऊन त्याचा पाठपुरावा करावा.
  8. 15 वित्त आयोग व 14 वित्त आयोगाच्या बृहृत आराखड्याचे वाचन ग्रामसभेमध्ये करावे.
  9. व्याळा गावातील घनकचरा व्यवस्थापनाकरिता गावामध्ये कचरा घंटागाडी सुरू करावी.
  10. गावातील सर्व चौकांना फॉर्म पुरुषाचे नावे देऊन नामफलक लावणे
  11. श्री दीपक जुमडे यांच्या घरापासून ते श्री शांताराम वानखडे यांच्या घरापर्यंत शिवकालीनला संरक्षण भिंत बांधावी यासह गावातील प्रमुख समस्या दूर करून ग्रामवासियांना मूलभूत गरजा ग्रामपंचायतीने पुरविण्यासाठी एक दिवशी आंदोलन करण्यात आले होते.
    आदरणीय सरपंच महोदय हे दुपारी अंदाजे दोन वाजेपर्यंत गावातच होते परंतु आंदोलनाची वेळ ही पाच वाजेपर्यंत असल्याने त्यांनी थांबणे गरजेचे होते तरीसुद्धा कोणत्याही बाबीला न जुमानता ग्रामपंचायत बंद करून हे अकोला येथे निघून आले त्यांना निवेदन घेण्यासाठी पोलिसांनी संपर्क केला असता माझी तब्येत ठीक नसल्याचे सांगितले त्यावर आंदोलकांनी माननीय तहसीलदार बाळापुर माननीय बिडिओ बाळापुर यांच्याशी फोन द्वारे संपर्क साधून सरपंच नसल्याची माहिती दिली त्यावर आंदोलकांनी ग्रामपंचायतीच्या दाराला निवेदन चिटकविण्याचे ठरविले होते परंतु माननीय तहसीलदार व व्हिडिओ यांनी स्वातंत्र्य पंधरावाला असल्याने ही योग्य नाही सरपंच थांबणे गरजेचे होते तरीसुद्धा प्रशासनाची जबाबदारी म्हणून गावचे ग्रामसेवक माननीय राहुल उंद्रे सर यांना आदरणीय तहसीलदार साहेब बीडिओ साहेब यांच्या आदेशान्वे पाठविण्यात आले व आंदोलकाच्या भावना समजून घेतल्या व ग्रामसेवक राहूल उंदरे यांनी प्रशासनाच्या वतीने सदर निवेदन स्वीकारले. व्याळा गावातील सर्व मतदारांनी मोठ्या विश्वासाने सर्वांना निवडून देऊन आपले प्रतिनिधी निवडले . प्रतिनिधींनी जनतेचे समस्यांना समजून न घेता त्याच्यां समस्यांवर पाठ फिरवली ही बाब अशोभनीय आहे तसेच रितसर परवानगी घेऊन आंदोलन करत असल्याने सरपंच यांनी थांबणे गरजेचे होते परंतु वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना न जुमानता निवेदन न स्वीकारण्याचे ठरविले त्या विरोधात वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ते सरपंच गजानन वजिरे यांची तक्रार व गावातील समस्या निकाली काढण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी अकोला यांच्याकडे तक्रार करणार आहेत व समस्या निकाली निघत नाही तोपर्यंत यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय करत आहे या संदर्भात सर्व वरिष्ठांना माहिती देण्यात आली. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे महानगर महासचिव गजानन गवई माजी जिल्हा प्रवक्ता धर्मेंद्र दंदी सामाजिक कार्यकर्ते देवेश पातोडे मोरेश्वर खंडारे शंकरराव राजुस्कर यांनी भेट दिली. वंचित बहुजन आघाडी व्याळा वाशियांच्या पाठीशी राहील असे आश्वासन सुद्धा दिले. आंदोलनांमध्ये खालील ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवला यामध्ये गजानन दांडगे गौतम वानखडे विलास वानखडे संदीप दामोदर रमेश पाटील सविताताई वानखडे शेख अलीम शेख सलीम शांताराम कोकाटे गजानन डांगे उज्वल ठाकरे संघपाल वानखडे प्रा. गजानन वाकोडे राहुल वानखडे गजानन आयणे सदाशिव दामोदर प्रभाकर हरणे अमर खंडारे योगेश नटकुटे सुभाष उगवेकर मनोहर सोनटक्के गुलाबराव चाळसे हरिदास मांगटे शंतनू मांगटे गुड्डू माने ईश्वर वानखडे शेख नाझीम विशाल गवई संदीप राऊत योगेश राऊत गुड्डू माने शेख गौश सुनील दाभाडे राहुल सुरवाडे प्रदीप मेहरे दत्तात्रय मांगटे विनोद बोचरे अभिषेक वानखडे मिलिंद वानखडे मनोज घाटोळे विकी वानखडे अजय सरदार सुरेंद्र डाबेराव राजू इंगळे चत्तरसिंग झाकर्डे प्रभू गिरे आदित्य म्हैसने दीपक म्हैसने ईश्वर गिरी प्रमोद बोचरे गणेश बोचरे अमोल आयने मंगेश दामोदर अविनाश वाकोडे रमजान शहा दत्तात्रय सोळंके हनीफ शहा प्रल्हाद रेवसकर उत्तमराव वाडेकर शेख एजाज भाई रंजीत बाबू दामोदर मनोहर सोनटक्के श्रीकृष्ण दळवी शेख भाई पुरुषोत्तम कावरे पुरुषोत्तम पळसकर त्र्यंबक वानखडे किशोर देशमुख अनिल वानखडे ज्ञानेश्वर मांगटे अरुण कात्रे अविनाश पवार करण वानखडे विष्णू म्हैसणे योगेश राऊत संजय माने सतीश बोळे श्रीकृष्ण लांडे मोहम्मद फारुख मोहम्मद इस्माईल शेख हारून शेख गणी राजेश वारकरी विजय इंगळे पुरुषोत्तम वारकरी मोहन मांगटे बुद्धभूषण दामोदर शेख आयुब भाई विजय देशमुख सौ कुसुम लक्ष्मण नटकुटे सौ आशा दिनेश नटकुटे पुंडलिक दाभाडे प्रमोद जुंबळे अनिल नथवाणी विष्णू डोंगरे विजय ढोकणे निलेश ढोकणे पुरुषोत्तम सोनोने सुनील चाळसे मोहन मानकर पंजाब काळबागे सुनील अडचुले वासुदेव दातीर बंडू वानखडे विलास वारकरी दिगंबर जळमकर मोहन मांगटे मुकेश देशमुख राजेश जंजाळ किशोर प्र देशमुख शत्रुघ्न वानखडे योगेश देशमुख प्रल्हाद दामोदर महेंद्र वानखडे संदीप दामोदर इत्यादी व्याळा ग्रामस्थांनी आपल्या सहिनिशी सक्रिय सहभाग नोंदवून व आंदोलनाला पाठिंबा दिला. येत्या पंधरा दिवसात प्रश्न निकाली न निघाल्यास व्याळा ग्रामवाशियांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे. गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Leave a Reply

Your email address will not be published.