
अकोला:शहरात गोवंशाची कत्तलीच्या उद्देशाने होणारी अवैध वाहतून तथा चोरी यांना प्रतीबंध घालणेबाबत मा. पोलीस अधिक्षक अकोला यांचेद्वारे सुचना प्राप्त असून आज दिनांक 13/08/2024 रोजी श्री. सतिश कुलकर्णी, उपविभागिय पोलीस अधिकारी शहर विभाग यांचे मार्गदर्शना खाली त्यांचे पथकाने अकोट फाईल पोलीस स्टेशन हद्दीतून गोवंशाची कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक होणार असल्याच्या प्राप्त गोपनिय माहीतीच्या आधारावर हद्दीतील आपातापा चौक येथे नाकाबंदी केली असता सदर पथकाला सकाळी 6:15 वाजता प्राप्त माहीतीप्रमाणे म्हैसांगकडून एक पांढऱ्या रंगाची MH29BE5703 क्रमांकाची पिकअप गाडी शहराकडे येतांना दिसली. सदर वाहनास पथकाने थांबविण्याचा प्रयत्न केला असता वाहन चालकाने वाहन न थांबता भरधाव वेगाने पळवून नेले. तेव्हा सदर वाहनामध्ये गोवंश जातीचे जनावरे कोंबलेल्या अवस्थेत दिसल्यामूळे पथकाने सदर वाहनाचा पठलाग केला. तेव्हा आरोपीने पळून जाण्याच्या उद्देशाने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालवून NH-53 वरील कुरणखेड येथे असलेल्या टोल नाक्यावरील बॅरीगेट उडवून दिले. तरीही पोलीस त्याचा पाठलाग करीत आहेत हे पाहून आरोपी चालकाने भितीपोटी त्याचे ताब्यातील वाहन ग्राम सोनोरी ता. मुर्तिजापूर जि. अकोला येथे सोडून वाहनाच्या क्लिनरसह तेथून पळ काढला. पथकाने त्यांचे वाहन ताब्यात घेऊन आरोपीतांचा परिसरात शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत. आरोपी सोडून गेलेल्या वाहनाची पंचासमक्ष पाहनी केली असता त्यामध्ये गोवंश जातीचे एकून 10 जनावरे कत्तली करीता घेऊन जाण्याच्या उद्देशाने निर्दयतेने कोंबलेले मिळून आले. सदर गोवंश जातीचे जनावरे अं. किं 3,50,000/- रुपये आणि गुन्हयातील वाहन अं. किं. 6,60,000/- रुपये असा एकून 10,10,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. गुन्हयातील दोन अज्ञात आरोपीतांविरुध्द पोलीस स्टेशन अकोट फाईल येथे भारतीय न्याय संहीता, महा. प्राणी संरक्षन कायदा, प्राण्यांना निर्दयतेने वागणूक कायद्याच्या विविध तरतूदी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीतांचा शोध सुरु आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिंह, अपर पोलीस अधिक्षक श्री अभय डोंगरे आणि उपविभागिय पोलीस अधिकारी श्री सतीश कुलकर्णी श.वि.अकोला यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि रत्नदिप पळसपगार, पो.कॉ. अनिल खळेकर, संदीप गुंजाळ, विनय जाधव, रवि घिवे, पो.काँ. राज चंदेल यांनी पार पाडली.