अकोला शहरातील सराफा दोन दुकानातुन चोरीचे गुन्हे उघड…..एक महिला आरोपीसह ६१,०००/- रू चा मुददेमाल जप्त….

अकोला:दिनांक ०९/०८/२०२४ रोजी पो.स्टे. सिटी कोतवाली हद्दीत धर्मचक्र ज्वेलर्स या दुकानामथुन ग्राहक बनवुन सोन्याचे दागिने पाहत असतांना एका अनओळखी बुरखा धारी महिलेने हात चालाखी करून दुकानातील सोन्याचे दागिने चोरून नेले असल्याचे फिर्यादी यांनी पो.स्टे. सिटी कोतवाली येथे तकार दिल्यावरून पो.स्टे. ला अप क्र. २५४/२०२४ कलम ३०३ (२) भा. न्या.सं., अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचे तपासात गुन्हयाची उकल करण्याकरिता स्था.गु.शा. अकोला कडुन सि.सि.टी.व्ही. फुटेज ची पाहणी केली असता सदर फुटेज मध्ये एक बुरखाधारी महिला सोन्याचे दागिने चोरी करतांना दिसुन आल्याने स्थानिक गुन्हे शााखेचे प्रभारी अधिकारी शंकर शेळके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पथकाला सदर गुन्हा उघडकिस आणण्याबाबत मार्गदर्शन करून सुचना देण्यात आले असता सदर पथकाने गोपनिय बातमीदाराकडुन मिळालेल्या बातमी वरून दिनांक ११/०८/२०२४ रोजी महिला पोलीस अंमलदार यांचे मदतीने सलाम नगर अकोट फाईल येथे राहणा-या एका संशयित महिलेस कायदेशीर रित्या ताब्यात घेवुन गुन्हयाबाबत कौशल्यपुर्वक विचारपुस केली असता तिने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली सदर बुरखाधारी महिलेकडुन गुन्हयातील चोरी गेलेले १) एक प्लेन सोन्याची कानातली बाली अंदाजे वजन ४०० मिली की अं ३,०००/रू, २) दोन तिन लाईन स्टोन वाली सोन्याचे कानातली बाली वजन अंदाजे १ ग्रम ५०० मिली की अं १०,०००/रू ३) दोन सिंगल लाईन स्टोन सोन्याची बाली वजन अंदाजे २ ग्राम ५०० मिली की अं १८,०००/रू, असे एकुण सोन्याचे ०५ नग रिंग एकुण वजन अं. ४ ग्राम ४०० मिली. कि. ३१,८००/रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दिनांक २०/०७/२०२४ रोजी पो.स्टे. सिव्हील लाईन अकोला हद्दीतुन PNG ज्वेलर्स मधुन सोन्याचे दागिने चोरी केल्याबाबत पो.स्टे. ला. अप क्र. ४०६/२०२४ कलम ३०३ (२) भा.न्या.सं. गुन्हा दाखल असल्याने सदर गुन्हयातील सि.सि.टी.व्ही. फुटेज ची पडताळणी केली असता वर नमुद बुरखाधारी महिलेचे असल्याचे निष्पन्न झाल्याने व सदरील चोरी केली असल्याचे कबुली दिल्याने नमुद महिलेने चोरी केलेले सोन्याचे दागिने विकुन मोबदल्यात मिळालेली रक्कम जप्त करण्यात आली. सदर महिलेस पुढील तपासकामी पो.स्टे. सिटी कोतवाली यांचे ताब्यात देण्यात आले.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिंह सा, जि. अकोला, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री अभय डोंगरे सा, जि अकोला, यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. शंकर शेळके सा. स्थानिक गुन्हे शाखा अकोला व स्था.गु.शा. येथील पो.उप.नि. गोपाल जाधव, स.पो.उप.नि. गणेश पांडे, पोलीस अंमलदार फिरोज खान, खुशाल नेमाडे, आकाश मानकर, धिरज वानखडे, मोहम्मद आमीर, अभिषेक पाठक, स्वप्नील चौधरी, महिला पो. कॉ. स्वप्ना चौधरी, ज्योत्स्ना लाहोळे यांनी केली.

अकोला जिल्हयात सध्या श्रावण महिना सुरू असल्याने राजराजेश्वर मंदीरामध्ये भावीक हे देवदर्शनाकरिता येत असल्याने दिनांक ०५/०८/२०२४ रोजी एका महिलेचे गळयातील सोन्याचे मंगळसुत्र चोरी गेलेस आहे. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी व पो. अंमलदार यांनी मंदीरामधील सि.सि.टी.व्ही. फुटेज प्राप्त करण्यात आले असुन सदर आरोपी महिलेचा शोध घेवुन लवकरच गुन्हा उघड करण्याचा प्रयत्न सुरू आहेत. अकोल्या जिल्हयातील सर्व जनतेला पोलीसांन तर्फे आवाहन करण्यात येते कि, श्रावण महिन्यात गर्दीच्या ठिकाणी जातांना महिलांनी मौल्यवान वस्तु परिधान करण्यास टाळावे.

Leave a Reply

Your email address will not be published.