
अकोला जिल्हात मोठ्या प्रमाणात गोवंश जातीचे जनावरे वाहतुक करून कत्तली करीता घेवुन जाण्याचे प्रमाणे वाढत असल्याने मा. पोलीस अधिक्षक साहेब अकोला यांनी आदेशित करून त्यास प्रतीबंध करणे बाबत सुचना दिल्याने स्थानिक गुन्हे शाखा, अकोला चे प्रमुख श्री. शंकर शेळके यांनी गोवंश कार्यवाही करीता पथक गठीत केले. या पथकाने गोपणीय बातमीदाराकडुन माहीती घेवुन आज दि १०/०८/२०२४ रोजी पो स्टे हिवरखेड हददीतील शक्ती चौक हिवरखेड येथे नाकाबंदी करून गोवंश जनावरे कत्तली करीता घेवुन येणारे दोन चार चाकी मालवाहु वाहणे पकडुन त्या मध्ये ०८ गोवंश जातीचे जनावरे की अं २,००,०००/- रू तसेच गोवंश वाहतुकी करीता वारपरण्यात आलेली दोन चार चाकी मालवाहु वाहण की अं १०,००,०००/- रू असा एकुण १२,००,१००/- मुददेमाल हस्तगत करून आरोपी नामे १) अब्दल नाजीम अब्दुल नजीर वय ३० वर्ष २) शेख कासीम शेख नजीर वय २२ वर्ष दोन्ही रा. दिवाणझरी, ता. तेल्हारा जि. अकोला यास पुढील तपास कामी पो स्टे हिवरखडे यांचे ताब्यात देण्यात आले तसेच नमुद गोवंश हयांना पुढील संगोपणा करीता गौरक्षण संस्था, दर्यापुर रोड, अकोट ता. अकोट जि. अकोला येथे ठेवण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चनसिंह सा, मा. अपर पोलीस अधिक्षक, श्री अभय डोंगरे सा, यांचे मार्गदर्शना खाली पो. नि. श्री शंकर शेळके स्थानिक गुन्हे शाखा, पो.उप.नि. आशिष शिंदे, चालक ग्रेड पो.उप.नि. विनोद ठाकरे व स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पोलीस अंमलदार प्रमोद ढोरे, सुलतान पठान, खुशाल नेमाडे, धिरज वानखडे, आकाश मानकर, स्वप्निल चौधरी, अभिषेक पाठक, सतिश पवार, अशोक सोनोने यांनी केली.