अकोला: दि.०४/०५/२०२४ रोजी पो.स्टे. खदान येथील अप क ३८५/२४ कलम ४५७, ३८० भा.दं.वि प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपासावर आहे. सदर गुन्हयातील घरफोडी मध्ये सोने, चांदी तसेच रोख असा एकुण ४३,७७,३१७ रूपयाची चोरी झाली होती. सदर गुन्हयाच्या घटनास्थळी मा. पोलिस अधिक्षक सा. अकोला यांनी लेखी व तोंडी आदेश देवुन सदर गुन्हयात उघडकीस आणनेकामी आदेशीत करून सुचना दिल्यावरून स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांचे पथक तयार करून आरोपीचा शोध घेण्यास सांगीतले. त्याअनुषंगाने पो. नि. शंकर शेळके, पोउपनि आशिष शिंदे व स्था.गु.शा. येथील यांचे पथकातील पोलीस अंमलदार यांनी घटनास्थळाचे आजुबाजुचा परीसराची पाहणी केली. परिस्थितीजन्य पुराव्यावरून गोपनिय माहितीचे आधारे गुन्हया घडल्या नंतर ४८ तासाचे आत स्थागुशा पथकाने आरोपी निष्पन्न करून अहमदनगर जिल्हयातुन आरोपी क १) जिगर कमलाकर पिंपळे वय ३७ वर्ष रा. पाखोरा, ता. गंगापुर, जि. संभाजी नगर यास ताब्यात घेवुन अटक केले होते. त्यानंतर आरोपी क २) सुनिल विठठल पिंपळे वय ५० रा गुरु धानोरा ता. गंगापुर जि.छ. संभाजी नगर यास अटक करण्यात आली होती. केलेल्या तपासात पथकाला सदर गुन्हयातील मुख्य आरोपी विवेक उर्फ चावल्या कमलाकर पिंपळे वय ४० वर्ष रा. ग्राम वझर ता गंगापुर जि.छ. संभाजी नगर हा असल्याचे निष्पन्न झाल्याने व सदर गुन्हयातील सोने व डायमंड या दागीन्याची त्याने विक्री केल्या बाबत माहीती प्राप्त झाल्याने त्यास अटक करणे कामी पो. नि. शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांनी नमुद गुन्हयातील मुख्य फरार आरोपी याचा शोध घेवुन गुन्हयातील मुददेमाल हस्तगत करणेसाठी पोउपनि गोपाल जाधव व पोलीस अमलदार पथक गठीत केले. त्यानंतर नमुद पथकाने सदर गुन्हयाचा तपास करून तांत्रीक बाबींचा व गोपनीय माहीतीचे आधारे गुन्हयातील मुख्य आरोपी नामे विवेक उर्फ चावल्या कमलाकर पिंपळे वय ४० वर्ष रा. ग्राम वझर ता गंगापुर जि.छ. संभाजी नगर यास बिहार राज्यातुन अटक करून गुन्हा करते वेळी वापरेलेले हायड्रोलीक कटर, टामी, मोठे पेचकस व इतर साहीत्य तसेच गुन्हयातील चोरी गेलेला मुददेमाल पैकी २५,००,०००/-रू चा मुददेमाल हस्तगत केले.
- सदर पथक हे गुन्हयातील आरोपी शोध कामी गुन्हा घडल्यापासुन सलग ७८ दिवस गुन्हा उघडकीस आणणे करीता परीश्रम घेत होते.
- सदर तपास पथक हे आरोपी शोध करीता ०३ राज्य (बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश) जावुन आरोपीचा शोध घेतला.
- सदर गुन्हयात तपास पथकाने आरोपी शोध कामी ०५ राज्यात एकुण ७ हजार किलो मीटर चा प्रवास केला
- तपास पथकाने आरोपी शोध कामी मध्यप्रदेश मधील विदिशा, छनेरा, खंडवा, तसेच बिहार मधील आरा, पुनपुन व उत्तर प्रदेश मधील प्रयागराज व कौश्यबी जिल्हयात शोध घेण्यात आला.
- सदर गुन्हयात कोणताही पुरावा उपलब्ध नसतांना तसेच आरोपीने मोबाईल व वाहनाचा वापर न करता सुध्दा क्लिस्ट गुन्हयाचा स्थानीक गुन्हे शाखा अकोला कडुन आरोपीचा शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणला. * सदर गुन्हयात अंदाजे २ ५,००,०००/-रू चा मुददेमाल जप्त करण्यात स्थानीक गुन्हे शाखा अकोला पथकाला यश आले.
गुन्हयाचा तपास पुढील तपास सुरू आहे.
सदर तपास पथकाने गुन्हयात १) एक सोन्याची अगंठी डायमंड सह वजन ४ ग्रॅम २) दोन सोन्याचे कानातले जोड डायमंड सह वजन ३ ग्रॅम ३) दोन सोन्याचे कानातले जोड डायमंड सह वजन ८ ग्रॅम ४) एक सोन्याचा आकाराचा नेकलेस ०३ डायमंडसह वजन अं १८ ग्रॅम ५) एक सिल्व्हर रंगाचा नेकलेस मोठया डायमंड सह वजन अं १५ ग्रॅम ६) एक सोन्याची लगड की अं २३८ ग्रॅम असा एकुण २५,००,०००/-रू चा मुददेमाल यातील मुख्य आरोपी कडुन जप्त करण्यात आले.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चनसिंह सा, मा. अपर पोलीस अधिक्षक, श्री अभय डोंगरे सा. यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला, स.पो.नि श्रीधर गुटट्टे, पो.उप.नि. गोपाल जाधव, पो.उप.नि आशिष शिंदे सोबत पोहवा अब्दुल माजीद, महेंद्र मलिये, अविनाश पाचपोर, रविद्र खंडारे, गोकुळ चव्हाण, खुशाल नेमाडे, वसीमोद्दीन, राहूल गायकवाड सर्व था.गु.शा. अकोला तसेच सायबर सेलचे पो. शि. आशिष आमले, गोपाल ठोंबरे व चालक पो. हवा प्रशांत कमलाकर तसेच पोलीस मुख्यालय येथील मपोका सिमा ढोणे तसेच दहशतवादी विरोधी पथक जालना पो. हवा. विनोद गर्डे यांचे सहकार्य लाभले.