अकोला बौद्ध समाज संघर्ष समितीच्या वतीने युवकांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या दोन्ही घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला या मोर्च्यात जिल्ह्यातील समस्त युवा भीमसैनिक वृद्ध महिला सामील होऊन जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय येथे या दोन्ही गंभीर स्वरूपाचे गुन्ह्यात न्याय भूमिका बजावण्याचे निवेदन देण्यात आले आहे दरम्यान रामदास पेठ पोलीस स्टेशन अंतर्गत झालेल्या एका घटनतेत देशमुख फ़ैल निवासी साक्षांत तेलगोटे यांच्या काही अज्ञात समाजकंटक इसमाने जीवे मारण्याच्या उद्देशाने प्राणघातक हल्ला केला होता तसेच तेल्हारा पोलीस स्टेशन अंतर्गत भांबेरी येथील अक्षय भोजने या युवकांवर जातीय द्वेषातून गंभीर स्वरूपात प्राणघातक हल्ला करण्यात आला.
या दोन्ही घटनेने बौद्ध समाजात असंतोषाचे वातावरण निरामन झाले असून आतापर्यंत अकोला पोलीस प्रशासन कडून कुठल्याही प्रकारची कारवाही किंवा हल्लेखोराना अटक करण्यात आली नाही या प्रकारावर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे बौद्धसमाज संघर्ष समितीच्या वतीने मोठ्या जन संख्येत मोर्चा काढण्यात आला होता या मोर्च्यात समस्त युवा भीम सैनिक महिला वर्ग, वृद्ध हजारोच्या संख्येने सामील होते.
जिल्हयात दलित आणि बौद्ध समाजावरील अन्याय सहन करण्यात येणार नाही. अकोला पोलीस प्रशासनाने या दोन्ही प्रकारात योग्य कारवाही करून दोन्ही घटनेच्या हल्ले खोराना अटक करण्यात यावी अशी मागणी घेऊन अकोला पोलीस अधिक्षक यांना समस्त बौद्ध समाज संघर्ष समितीच्या वतीने दिनांक 18 जुलै गुरुवार रोजी दुपारी चार वाजता मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.