अकोला; दिनांक ०५/०७/२०२४ रोजी मुंबईवरून तुर घेवुन निघालेला ट्रक क्रमांक MH-18-BG- 5491 हा M.I.D.C. अकोला येथे दिनांक ०६/०७/२०२४ रोजी मिडास कंपनी गोडावुन येथे अंदाजे दुपारी ०२:०० वाजता दाखल झाला व ट्रक मालकाने कंपनीचे ताब्यात कागदोपत्री ट्रक दिला. सदर ट्रक त्याच रात्री ०९:०० वाजताचे सुमारास अज्ञात व्यक्ती कंपनीचे गेट मधुन तुरचे ६०० बॅग मालासह चोरून घेवुन गेला. सदरील ट्रक हा कंपीनचे ताब्यात कागदोपत्री दिल्याने ट्रक मालकाची जबाबदारी संपल्याने सदरील माल हा मिडास कंपनीचे ताब्यातुन चोरीला गेला होता.
दिनांक ०७/०७/२०२४ चे दुपारी वर नमुद ट्रक रिकामा असलेला बोरगावं जवळ रोड वर उभा मिळुन आला. सदरील रिकामा ट्रक पो.स्टे. M.I.D.C. अकोला येथे जप्त केला. परंतु गुन्हा दाखल नसल्याने ट्रक हा ट्रक मालकास परत देण्यात आला. सदर प्रकरणी ६०० बॅग तुर चोरी झालेली असल्याने मिडास कंपनीचे मालकाचे नुकसान झाल्याने मिडास कंपनीचे मालक बन्सीधर साधवानी हे दोन तीन सहकार्यासह पोलीस अधीक्षक कार्यालय अकोला येथे येवुन मा. पोलीस अधीक्षक सा. यांची भेट घेवुन झालेल्या प्रकरणाचे कथन करतात मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह सा. यांचे आदेशाने पो.स्टे. M.I.D.C. अकोला येथे दिनांक १२/०७/२०२४ रोजी गुन्हा दाखल केला. चोरी गेलेल्या मालाची किंमत ३६लाख ३० हजार रूपये असल्याने गुन्हयाचा संमातर तपास करून गुन्हा उघडकिस आणण्याचे तोंडी आदेश मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह सा. यांनी स्थानिक गुन्हे शाखा अकोला प्रभारी यांना दिल्याने व प्रकरणाचे गांभिर्य ओळखुन स्था.गु.शा. प्रभारी श्री. शंकर शेळके यांनी स्वतः फिर्यादी यांचे म्हणुन ऐकुण घटनाक्रम नुसार C.C.T.V. फुटेज प्राप्त करून तसेच गोपनिय माहिती मिळवुन गुन्हा उघडकिस आणण्या करिता एक पथक तयार करून त्यांना सदरील गुन्हा उघडकिस आणण्याबाबत सुचना देवुन मार्गदर्शन दिले व स्वतः पो.नि. शंकर शेळके सा. यांनी तांत्रीक बाबीची पडताळणी करून ०३ दिवसात दिनांक १५/०७/२०२४ रोजीचे मध्यरात्री सदर गुन्हयात ट्रक मालक नामे १) अब्दुल फारूख अब्दुल खालीद वय ५५ वर्ष व त्याचा मुलगा नामे २) गुलाम ख्वाजा मोहम्मद फारूख वय- २५ दोन्ही रा. रा पोळा चौक कल्याण वाडी, जुनेशहर अकोला यांचा गुन्हयात सहभाग असल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे कडुन तुर विकल्याचे बदल्यात मिळालेली अॅडवांस रक्कम ७,००,०००/ रू जप्त करण्यात आले. गुन्हयात वापरलेला ट्रक क्रमांक MH-18-BG-5491 कि.अं. २०,००,०००/ रु चा स्थानिक गुन्हे शाखा अकोला कडुन जप्त करण्यात आला. व चोरीचा माल घेणारे
आरिफ अब्दुल कय्युम वय ५५ वर्ष रा. मासुम शाह दर्गा अकोला व आरोपी नामे शिवाजी वसंतराव थोरात वय ३५ वर्ष, धंदा : अडत रा. चिखलगाव ता. जि. अकोला ह.मु. नरेंद्र नगर, डाबकीरोड अकोला यांनी चोरीची तुर घेतल्याचे कबुली दिल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे जवळुन उर्वरित ४०० बॅग (प्रत्येकी बॅग ५० किलो) तुर कि.अं. २४,२०,०००/रू ची व गुन्हा करतांना वापरण्यात आलेला ट्रक क्रमांक MH-18-BG-5491 कि.अं, २०,००,०००/ रूचा व नगदी ७,००,०००/ रू, तसेच ०४ मोबाईल ४०,०००/-रू चा असा एकुण ५१,६०,०००/ रू चा मुद्देमाल वर नमुद ०४ आरोपीसह पुढील तपासकामी पो.स्टे. M.I.D.C. अकोला यांचे ताब्यात देण्यात येत आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिंह सा, जि. अकोला, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री अभय डोंगरे सा, जि अकोला, यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. शंकर शेळके सा. स्थानिक गुन्हे शाखा अकोला व स्था.गु.शा. येथील पो.उप.नि. गोपाल जाधव, आशिष शिंदे, पो. अमंलदार राजपालसिंह ठाकुर, दशरथ बोरकर, गणेश पांडे, फिरोज खान, उमेश पराये, सुलतान पठाण, भास्कर धोत्रे, गोकुळ चव्हान, रविंद्र खंडारे, अब्दुल माजीद, महेंद्र मलिये, खुशाल नेमाडे, अविनाश पाचपोर, वसिमोद्दीन, आकाश मानकर, धिरज वानखडे, मोहम्मद आमीर, अभिषेक पाठक, अन्सार अहमद, अमोल दिपके, लिलाधर खंडारे, स्वप्नील चौधरी, सतिश पवार, सायबर सेल चे राहुल गायकवाड, आशीष आमले, गोपाल ठोबरे चालक पो. अंमलदार प्रशांत कमलाकर, विजय कबले यांनी केली.