गोवंश जातीचे ०५ बैल कत्तली करीता निर्दयतेने चारचाकी वाहनामधुन घेवुन जाणा-यांना पोलीसांनी पो. स्टे.सिटी कोतवाली हददीमध्ये पकडले.

अकोला दिनांक ११/०७/२०२४ रोजी सकाळी ०७:१५ वा. चे सुमारास पो.स्टे. सिटी कोतवाली. अकोला येथे श्री सतिश कुलकर्णी, उप विभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग, अकोला साहेब यांचे आदेशान्वये SDPO कार्यालय शहर विभाग येथील पथक कर्मचारी व शहर वाहतुक शाखा येथील पोउपनि जयवंत शिंदे आणि पो. स्टाफ यांनी लक्झरी बस स्टॅन्ड चौक येथुन कत्तली करीता अवैधरित्या निर्दयतेने गोवंशी जातीचे बैल घेवुन जाणा-या अशोक लेलॅन्ड कं. ची (पिकअप बडादोस्त) गाडी क्रमांक एम एच १९ सी वाय ८६५३ मधील एकुण ०५ गोवंश जातीचे बैल व नमुद वाहन ताब्यात घेतले.

मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह सा. तसेच मा. अप्पर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे व श्री सतिश कुलकर्णी, SDPO, शहर विभाग, अकोला यांचे मार्गदर्शनात पोउपनि जयवंत शिंदे तसेच SDPO शहर विभाग कार्यालय येथील पो. हवा. अनिल खडेकार/१०६९, पो.हवा. रवि घिवे/२०९३, पो.हवा. विनय जाधव/२०१८, पो.ना. मो नदीम/१४६, शहर वाहतुक शाखा येथील पो.कॉ. रवि चव्हाण/४५४, पो.कॉ. अनिल लापुरकर /२१८४ यांनी लक्झरी बस स्टॅन्ड चौक येथे नाकाबंदी करून अशोक लेलॅन्ड कं. ची (पिकअप बडादोस्त) गाडी क्रमांक एम एच १९ सी वाय ८६५३ थांबविले असता इसम नामे १) शेख अजीम शेख कयुम, वय २५ वर्ष, रा. प्रतिभा नगर, वरणगाव, ता. भुसावल, जि. जळगांव (चालक), २) शेख सलमान शेख इसाक, वय १९ वर्ष, रा. प्रतिभा नगर, वरणगांव, ता. भुसावळ, जि. जळगांव यांना जागीच पकडले. वाहनामध्ये मागील बाजुस कत्तली करीता निर्दयतेने दाबुन घेवुन जात असलेले ०५ गोवंश जातीचे बैल एकुण कि.अं. २,७५,०००/- रू अशोक लेलॅन्ड कं. ची बडादोस्त (पिकअप) गाडी क्रमांक एम एच १९ सी वाय ८६५३ वाहनाची अं. किं. ७,५०,०००/- रू असा एकुण १०,२५,०००/- रू चा मुददेमाल कारवाई करून जप्त केला. पो.स्टे. सिटी कोतवाली येथे अप.क. २३८/२०२४ कलम ५, ५ (अ), ५ (ब), ९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा सहकलम ११ (ल) प्राण्यांना निर्दयतेने वागणुक अधि. सहकलम ३२५ (४२९) भा.न्या.स. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सिटी कोतवाली पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.