मालमत्तेच्या व शरीराविरुध्दच्या गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा याकरीता अमावस्या नाकाबंदी, कलम १२२ मपोका प्रमाणे ०५ केसेस व ०२ तडीपार आरोपीस अटक……

अकोला प्रतिनिधी: जिल्हयात मालमत्तेच्या गुन्हयांना आळा बसावा याकरीता दि.०४.०७.२०२४ वे रात्री २२.०० वा ते दि.०५. ०७.२०२४ चे ०५.०० वा पावेतो मा. पोलीस अधीक्षक, श्री. बच्चनसिंह यांचे आदेशान्वये अकोला जिल्हयात अमावस्या नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व ठाणे प्रभारी अधिकारी व दुय्यम अधिकारी असे एकुण २३ अधिकारी व २०८ अंमलदार यांनी सहभाग घेवुन नाकाबंदी दरम्यान खालील प्रमाणे प्रभावी कारवाई करण्यात आली.

नाकाबंदी दरम्यान बेरेकेटींग करून जिल्हयात ५१० वाहने चेक करून मोटार वाहन कायदयान्चये ४५ कारवाई करून १८,५००/-रू चा दंड आकरण्यात आला आहे. तसेच १०१ समन्स, ३६ जमानती वॉरंट, ०९ पकड वॉरंट तामील करण्यात आले. ७७ अभिलेखावरील निगराणी बदमाश व माहितीगार गुन्हेगार यांना चेक करण्यात आले व कलम १२२ मपोका प्रमाणे ०५ कारवाई, कलम १४२ मपोका प्रमाणे ०२ केसेस करण्यात आल्या आहेत. कलम ३३ आर डब्लयु प्रमाणे ०३ केसेस तर कलम ११०, ११७ प्रमाणे २३ केसेस करून जिल्हयातील ५१ हॉटेल लॉजेस वेचेक करण्यात आले. महाराष्ट्र दारू बंदी कायदयान्वये जिल्हयात ५ केसेस व महाराष्ट्र जुगार अधीनियम अन्वये ०२ केसेस करण्यात आल्या आहेत,

मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह यांनी जिल्हयात मालमत्तेच्या व शरीराविरुध्दच्या गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा याकरीता अमावस्या नाकाबंदी कोम्बीग ऑपरेशनचे आयोजन केले होते व भविष्यात सुध्दा वेळोवेळी अशा प्रकारच्या नाकाबंदीचे आयोजन करण्यात येईल असे प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.