
प्रतिनिधी अकोला: जिल्ह्यातील दगडपारवा येथील
रहिवासी असलेले अमोलजी नवघरे दिल्ली येथे सैनिक सेवेमध्ये कार्यरत असून, आपल्या सैनिक सेवेत सोबतच अनेक वर्षापासून समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासाठी सातत्याने मदत करत असतात, तसेच अकोला जिल्ह्यातील दिल्लीमध्ये येणाऱ्या नागरिकांना आपल्या परीने सातत्याने ते मदत करत असतात.
त्यांचे हे काम पाहता अनेक नागरिकांना नवघरेजी मदतीचा हात देत असतात, २४ जून रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त ने दगडपारवा येथे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये सक्रिय असलेले जीवन डिगे, व त्यांच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने अमोलजी नवघरे यांच्या वाढदिवसाच्या आयोजन करण्यात आले होते. वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण’ गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप’ सह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी अमोलजी
14
एप्रिल
अहे पदाव
नवघरे यांच्या वाढदिवस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या कार्याचे कौतुक केले, यावेळी अकोला शहर व ग्रामीण मधील समाजामध्ये काम करणाऱ्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी अमोलजी नवघरे यांचा जाहीर सत्कार केला. या कार्यक्रमाचे
आयोजन जीवन डिगे व त्यांच्या सर्व मित्र परिवारांनी केले होते. कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता. अकोला शहर व ग्रामीण मधील सामाजिक कार्यकर्ते व नेते मंडळी यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.