अकोला :दिनांक २६/०६/२०२४ हा दिवस जागतीक अंमली पदार्थ विरोधी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो, डिसेंबर १९८७ मध्ये संयुक्त राष्ट्राचे आम सभेमध्ये २६ जुन हा दिवस” अंमली पदार्थाचे सेवन व अवैध तस्करी विरोधी दिन” म्हणुन साजरा केला जातो. अंमली पदार्थ सेवन हि एक जागतीक समस्या आहे. तरी राज्यात अंमली पदार्थाचे विक्रीस व त्याचे सेवनास जास्तीत जास्त आळा बसणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन, स्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
त्यामध्ये आकाशवाणी केंद, अकोला वरून जिल्हयातील सर्व नागरीकांना अंमली पदार्थ कायदेविषयक व दुष्परिणामाबाबत जनजागृती पर ऑडीओ क्लिपव्दारे आवाहन करण्यात आले आहे., तसेच सोशल मिडीयावर (व्हॉट्स अॅप, ईन्स्टाग्राम, फेसबुक, ट्युटर, युटुब, जिल्हयातील मोबाईल व्हाट्स अॅप ग्रुप) अंमली पदार्थाबाबत जागृताकता निर्माण करण्यासाठी व्हिडीओ क्लिप, पोस्टर्स, बॅनर्स प्रसारीत करण्यात आले., जिल्हयातील शाळा, कॉलेज व परीसरात कार्यक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना व्यसनाधिनते बाबत दुर राहण्यासाठी सजग करण्यात आले व ई-प्रतिज्ञा घेण्यात आली. सदर उपक्रमांमध्ये जिल्हास्तरीय नार्को-कोऑर्डीनेशन सेंटर समीती सदस्य श्री. शंकर शेळके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला., श्री. एन. एन. बावसस्कर सहायक डाक अधीक्षक, अकोला., श्री.एम.एफ. सिद्दीकी अन्नसुरक्षा अधिकारी अकोला., डॉ. सोपान अंभोरे मनोविकृती सामाजीक कार्यकर्ता, अकोला. यांनी सहभाग नोंदवत जनजागृती केली.
आपल्या देशात विशेषतः तरूणांमध्ये, अंमली पदार्थ (गांजा, अफु, चरस, कोकेन, ब्राउन शुगर, ड्रञ्ज, हेरॉईन, व्हाईटनर, एमडीएम ईत्यादीचे) सेवन वाढत आहे. हि चिंतेची बाब आहे. म्हणुन त्यागोष्ठीला आळा बसावा याकरीता आम्ही अकोला पोलीसांच्या वतीने आवाहन करतो की, अंमली पदार्थाचे सेवन रोखण्यासाठी सहकार्य करू, कोणत्याही हेतुसाठी हानीकारक किंवा बेकायदेशीर पदार्थ बाळगनार नाही, सेवन करणार नाही. प्रत्येक व्यक्तीला विशेषतः तरूणांना प्रोत्साहन देवुन अंमली पदार्थाच्या दुष्परिणाम याबद्दल जागरूकता निर्माण करणे हे सर्व नागरीकांचे कर्तव्य आहे. जेणेकरून भारतातील तरूणांना अंमली पदार्थ मुक्त जीवन जगता येईल आणि ते समाजाचे सर्जनशील आणि महत्वाचे सदस्य बनु शकतील आज आपण अंमली पदार्थापासुन दुर राहुन निरोगी जीवन जगण्यास संकल्प करून ‘नशा मुक्त भारत बनवुया’ असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक, अकोला यांनी नागरीकांना केले आहे.
अकोला जिल्हयात माहे जानेवारी ते २५ जुन अखेर अंमली पदार्थ विरोधी कायदया अंर्तगत एकुण ८ गुन्हे दाखल असुन त्यामध्ये १३ आरोपी अटक करून २१२ किलो अंमली पदार्थ किंमत ३९लाखाचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच भविष्यात सुदधा विशेष मोहीम रावबुन अंमली पदार्थ विरोधी कायदया अंर्तगत कडक कारवाई करण्यात येईल, अंमली पदार्थ संदर्भात काहि माहिती असल्यास पोलीस निरीक्षक शंकर शेळके स्थानिक गुन्हे शाखा अकोला मोबाईल क. ९९२१०३८१११ वर कळवावे. माहिती देण्या-याचे नाव गोपनिय राहील. असे प्रसिदधी पत्रकाव्दारे कळविले आहे.



