NEET 2024 ची परीक्षा आणि निकाल रद्द करा आणि परीक्षा पुन्हा आयोजित करा भारतीय विद्यार्थी मोर्चा ची मागणी राज्यभरात तहसील व जिल्हाधिकरी कार्यालयावर निवेदने देण्यात आली

अकोला प्रतिनिधी:NEET UG-2024 परीक्षा NTA द्वारे 5 मे 2024 रोजी संपूर्ण भारतभर घेण्यात आली होती. यावर्षी जास्तीत जास्त म्हणजे सुमारे २४ लाख मुलांनी भाग घेतला. परंतु एनटीएने परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची व्यवस्था न केल्याचे दिसून आले. अनेक केंद्रांवर चुकीच्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्याने विद्यार्थ्यांचा बराच वेळ वाया गेला. तसेच परीक्षेच्या दिवशी बिहारमध्ये पेपर फुटल्याचे निष्पन्न झाले असून याप्रकरणी बिहार पोलिसांनी १३ आरोपींना अटक केली आहे. गुजरातमध्ये एका शाळेतील शिक्षकाने 10 लाख रुपयांना पेपर सोडवण्यास मदत केल्याची घटना समोर आली आहे. NEET चा निकाल 14 जून रोजी जाहीर होणार होता, अचानक 4 जून रोजी म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी.

NEET चा निकाल कसा जाहीर झाला? या सगळ्यामागे काय षडयंत्र आहे? एनटीएचे अधिकारीही या कटात सामील आहेत, असे म्हणायचे का? NEET ची ही चूक वैद्यकशास्त्राचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे मनोधैर्य खचवेल का? प्रत्येक वर्षी

NEET मध्ये हेराफेरीच्या बातम्या येत आहेत, त्याला जबाबदार कोण? भारतातील प्रत्येक नागरिक या प्रश्नांची उत्तरे शोधत आहे.

1) NEET UG परीक्षा 2024 आणि त्याचा निकाल रद्द घोषित करून परीक्षा पुन्हा घेण्यात यावी.
2) NEET 2024 परीक्षेतील गैरप्रकार आणि पेपर लीक करण्यात सहभागी असलेल्या सर्व अधिकाऱ्यांची CBI मार्फत चौकशी करण्यात यावी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी.

3) वारंवार होत असलेल्या अनियमिततेमुळे NTA ही खाजगी एजन्सी आपली विश्वासार्हता गमावून बसली आहे. त्यामुळे या एजन्सीचा करार संपुष्टात आणून NEET परीक्षा कोणत्या तरी सरकारी एजन्सीमार्फत घेण्यात यावी.

वरील मागण्या पूर्ण न झाल्यास देशभरातील विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरावे लागू शकते,असे आव्हान विद्यार्थी मोर्चाने केले आहे

भारतीय विद्यार्थी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रशिक मेश्राम, भारतीय युवा मोर्चाचे तेजस बांबोडकर, भारतीय बेरोजगार मोर्चाचे भूषण मेश्राम, ब्रह्मानंद चव्हाण (IMPA),संदेश कांबळे (IRSA), राहुल वाकोडे (BBM), योगेश जायले (BYM), चंदन वानखडे (BMP) इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published.