सावधान! अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देताय‌? अकोल्यात 9 व 25 मोवाका प्रमाणे कार्यवाही करण्यात आली गुन्हा; जाणून घ्या काय शिक्षा होणार?

अकोला प्रतिनिधी: जिल्हयातील पोलीस अधीक्षक मा. श्री. बच्चन सिंग साहेब यांचे संकल्पनेतुन व पोलीस निरीक्षक सुनिल किनगे वाहतुक नियंत्रण शाखा अकोला यांचे मार्गदर्शनात शहर वाहतुक नियंत्रण शाखा, अकोला व अकोला जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीत १८ वर्षा खालील वाहन चालविणारे वाहन चालक, मालक/पालक यांचेवर मोवाका व भा.दं. वि. प्रमाणे गुन्हे नोंद कार्यवाही करण्याकरीता संपुर्ण अकोला जिल्हयात दिनांक ३१/०५/२०२४ ते १६/०६/२०२४ दरम्यान विशेष मोहीम राबवीण्यात आली होतीसदर मोहीम दरम्यान शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला व जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी व अमंलदार यांचेकडुन १८ वर्षा खालील वाहन चालविणारे वाहन चालक, मालक/पालक यांचेवर मोटार वाहन कायदया प्रमाणे २५ केसेस करून २,२०,०००/- रू दंड आकारण्यात आला व भा.दं. वि. प्रमाणे एकुण ०९ गुन्हे विविध पोलीस स्टेशन मध्ये जिल्हयात नोंद करण्यात आले असुन पालकास माहिती असुन सुध्दा विना लायसन्स धारकांवर नमुद ०९ गुन्हयांमध्ये आरोपपत्र तयार करून न्यायालयात पाठविण्यात येत आहे. तसेच सदर गुन्हयामध्ये ०३ वर्ष कैद, २५०००/-रू दंड व वयाचे २५ वर्षा पर्यंत वाहन चालविण्याचे लायसन्स मिळणार नाही अशी तरतुद आहे.करीता वाहन मालक/पालक यांनी आपले वाहन १८ वर्षा खालील मुलांना किंवा वाहन चालविण्याचा परवाना नसेल अश्या व्यक्तींना वाहन चालविण्या करीता देऊ नये. वाहन चालकांनी वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. तसेच शाळा/महाविदयलय मधील मुख्याध्यापक यांनी १८ वर्षा खालील विदयार्थी यांना शाळा/महाविदयाल मध्ये दुचाकी वाहन न आनण्याबाबत सुचना दयावे व विदयार्थी यांनी दुचाकी वाहन शाळा/महाविदयलय मध्ये आनल्यास किंवा तसे निदर्शनास आल्यास शहर वाहतुक नियंत्रण शाखा येथे माहिती दयावी. वाहन चालकांनी चालवितांना सोबत वाहनांचे कागदपत्रे बाळगावे, वाहतुक नियमांचे पालन करावे व आपले वाहनावर पेंडीग दंड असल्यास त्वरीत वाहतुक पोलीस किंवा शहर वाहतुक कार्यालय येथे दंड भरावा, असे आवाहन मा. श्री. बच्चन सिंह साहेब पोलीस अधीक्षक अकोला यांनी अकोल जिल्हयातील नागरीकांना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.