14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार
स्थानिक: अकोला येथे दिनांक 7 जून रोजी शिवाजी इंजिनियरिंग कॉलेजचे हॉस्टेल मध्ये १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
हे हॉस्टेल नामांकित एका संस्थेच्या महाविद्यालयाच्या परिसरात आहे. येथे अल्पवयीन मुलीला आपल्या जाळ्यात फसवून मुलांच्या हॉस्टेलवर नेण्यात आले. नंतर तिथे तिघांनी मिळून सामूहिक अत्याचार केले. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
सदर प्रकरणात सिव्हिल लाईन पोलिसांनी पिडीत मुलीच्या कुटुबियांच्या तक्रारीवरुन गुन्हे दाखल करत अंकुश विलास वक्ते रा. कौलखेड अकोला, अनुराग मनोहर चौधरी रा.यावल जि. जळगांव आणि दिपक विठ्ठल मडावी रा. सिंधी कॅम्प, अकोला या तिघांना सामूहिक अत्याचार
केल्या प्रकरणी अटक केली आहे.
दि. ७ जून रोजी मुलगी घराबाहेर गेल्यानंतर पुन्हा रात्री घरी न परतल्याने पालकांनी व नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केला. काहीच कळत नसल्याने नंतर सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन येथे मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली. दुसऱ्या दिवशी मुलीने घरी परत आल्यावर सर्व प्रकार सांगितला. तेव्हा सामूहिक अत्याचार झाल्याची तक्रार दाखल केली. तदनंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
सदर प्रकरणामुळे शहरातील नागरिकांचा विश्वास शाळा,महाविद्यालय,वस्तीगृह यांच्यावरून उठतो की काय असा संभ्रम निर्माण होत आहे. एका प्रशस्त महाविद्यालयाच्या परिसरात अशी घटना घडणे म्हणजे निती- नियमांना फाट्यावर मारण्या- सारखे आहे.