“भारतीय संविधान : मानवी हक्कांची सनद” ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न…!

अकोला ( दि. २३ मे, २०२४) : स्थानिक प्रमिलाताई ओक सभागृह, अकोला येथे गुरुवार दि. २३ मे २०२४ रोजी बुद्धजयंतीच्या पावन पर्वावर सायं. ६.३० वाजता, प्रा. डॅा. एम. आर. इंगळे लिखीत भारतीय संविधान : मानवी हक्कांची सनद या ग्रंथाचा यासोबतच आयु.भीमराव मोहोड लिखीत “बहुजन क्रांतीगीते” आणि आयु. गजानन इंगळे लिखीत “आंबेडकरी उपेक्षित कलावंतांचे अंतरंग” या ग्रंथांचा संयुक्त प्रकाशन सोहळा अत्यंत भव्यदिव्य अशा थाटात संपन्न झाला. या तिनही ग्रंथाचे प्रकाशन सेवानिवृत्त आय. ए. एस. आयु. विश्वनाथ शेगांवकर यांच्या नालंदा प्रकाशन संस्था अकोला द्वारे करण्यात आले आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ आंबेडकरी कवी आ. कि. सोनोने होते. तर प्रकाशन सोहळ्याचे उद्घाटक म्हणून प्रा. जी. व्ही. एगांवकर, प्राचार्य, नथमल गोयनका विधी महाविद्यालय, अकोला हे होते. याप्रसंगी विचार पिठावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून आयु. पि. जे. वानखडे, अध्यक्ष, भारतीय बौध्द महासभा, अकोला, प्रमुख पाहुणे डॉ. भास्कर पाटील, डॉ. मोहन खडसे, डॉ. संदीप भोवते आणि लेखक डॅा. एम.आर. इंगळे, आयु. भीमराव मोहोड, आयु. गजानन इंगळे यांची उपस्थीती होती.

सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन व हारार्पण करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचे शाल, सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ व भारतीय संविधानाची प्रास्ताविका भेट देवुन स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेच्या सामुहीक वाचनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. राहुल माहुरे यांनी केले. त्यानंतर ग्रंथाच्या प्रकाशनासाठी ज्यांची मोलाची मदत झाली असे गुलाब तायडे, राजू चिमनकर, मिलिंद सभापतीकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सोबतच अकोलेकरांसाठी अभिमानाची बाब असलेले सिने कलावंत विक्की मोटे अभिनीत ‘अवनी की किस्मत’ हा सिनेमा स्क्रिनिंग साठी कान्स फेस्टीव्हल मध्ये गेल्याबद्द्ल विक्की मोटे यांचा सत्कार करण्यात आला.

त्यानंतर भीमराव मोहोड, गजानन इंगळे, डॅा. एम. आर. इंगळे या तिनही लेखकांनी आपल्या ग्रंथनिर्मीती बाबतची आपली भूमिका थोडक्यात विशद केली.उद्घाटक म्हणुन बोलतांना डॅा. जी. व्ही. एगांवकर यांनी सांगितले की भारत देश आज ज्या परिस्थितीतुन वाटचाल करीत आहे. त्या परिस्थितीत तरुणांनी आणि विशेषतः विद्यार्थी वर्गाने वाचनाकडे लक्ष देणे आणि अश्या प्रकारचं लेखन होणं ह्या दोन्ही बाबी महत्चाच्या आहेत. सोबतचं आपण सर्वांनी व्यक्त होणे गरजेचे आहे. त्या साठी सत्य व वास्तव समाजासमोर मांडण्यासाठी सभोवतालच्या परिस्थीतीचा आढावा घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले. यानंतर आयु. पि. जे. वानखडे, डॅा. भास्कर पाटील, डॅा. मोहन खडसे, डॅा. संदिप भोवते यांची शुभेच्छापर आणि ग्रंथावर समीक्षापर भाषणे झालीत.त्यानंतर अकोला शहर आणि अकोला जिल्ह्यातील जवळपास १५ सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी संविधानावर आधारीत ग्रंथाचे लेखन केल्याबद्दल डॅा. एम. आर. इंगळे सरांचा शाल व पुष्पगुच्छ भेट देवुन सत्कार केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन बोलतांना जेष्ठ कवी आयु. आ. कि. सोनोने यांनी सांगीतले की, बदलत्या काळात संवादाची माध्यमे व वाचनाची साधणे बदलली आहेत. या नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करतांना जुन्याची कास धरुन नव्या पिढीने वाटचाल करावी, जेणेकरुन नवनवीन कसदार साहित्य जन्मास येईल. नवीन लेखकांना वाव मिळेल, साहित्य व चळवळ समृध्द होईल, मात्र नवीन लेखकांनी बुद्ध संस्कृती जपणाऱ्या आणि वृद्धिंगत करणाऱ्या शब्दांचीच मांडणी करावी असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. वैष्णवी हागोने यांनी तर आभार प्रदर्शन विशाल नंदागवळी यांनी केले.

कार्यक्रमासाठी शहरातील विविध क्षेत्रातील प्रतिभावंत, कवी, साहित्यीक, लेखक, पत्रकार,अभ्यासक, संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी, भारतीय संविधानावर निष्ठा असणाऱ्या बंधू भगिनींची मोठ्याप्रमाणात उपस्थीती होती.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. राहुल माहुरे, डॅा. मनोहर वासनिक, प्रा. प्रकाश गवई, प्रा. ॲड. आकाश हराळ, अजिंक्य धेवडे, विक्की मोटे, विशाल नंदागवळी, आदित्य बावनगडे, शुभम गोळे, सुमेध कांबळे, सागर तेलगोटे, नागसेन अंभोरे, भरत चांदवडकर,रोहन काळे, कुंदन बोरकुटे, कुणाल मेश्राम यांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.