अकोला प्रतिनिधी: प्रशिक मेश्राम
१२ वी निकाल आज जाहीर झाला असून श्रीमती नरसम्मा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अमरावती येथील कला शाखेची खुशी मनिष मेश्राम ही महाराष्ट्र मधून भूगोल विषयात प्रथम तर राज्यशास्त्र या विषयात महाराष्ट्रामधून द्वितीय
आली आहे. भूगोल विषयामध्ये १०० पैकी १०० तर समाजशास्त्र व राज्यशास्त्र या विषयात १०० पैकी ९७ गुण तिने प्राप्त केले. याबद्दल संस्थेचे अध्यक्ष शेखर भोंदू तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश चंदनपाट यांनी विद्यार्थ्यांचे व संबंधित विषयाचे प्रा. सुमित पवार, प्रा. रामलाल उईके यांचे अभिनंदन केले.