महाराष्ट्रांतील 36 जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मा.वैद्यकीय शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय मुंबई.यांना निवेदन पाठवण्यात येत आहे…!
*त्याचाचं एक भाग म्हणून मंगळवार दि.21/05/2024 रोजी जिल्हाधिकारी अकोला यांच्या मार्फत मा.वैद्यकीय शिक्षण मंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले…!
यावेळी भारतीय विद्यार्थी मोर्चाचे जिल्हा संयोजक मा. प्रशिक मेश्राम,संदेश कांबळे(प्रदेशाध्यक्ष IRSA),वैष्णवी अकरते,चेतना तीतरमारे, ऋषिकेश शेगोकर,भूषण मेश्राम इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते
वैद्यकिय शिक्षण व संशोधन संचालनालय (डीएमईआर) मार्फत शासकीय वैद्यकिय / दंत / आयुर्वेद तसेच मानसिक आरोग्य केंद्र विभागांतर्गत गट-क अधिपरिचारिका या पदासाठी सरळसेवा भरती 10 मे 2023 रोजी आयोजित केली होती. सदर भरतीत माजी सैनिकांसाठी एकूण 603 पदे राखीव असून केवळ 3 माजी सैनिक पात्र व 05 अपात्र उमेद्वार (ज्यांचा पात्रतेचा निर्णय न्यायप्रविष्ठ आहे) उपलब्ध असुन 595 रिक्त असलेले पदे संबंधित जातीच्या प्रवर्गातून प्रतिक्षा यादीतून भरण्याकरीता डीएमईआर (DMER) ने वारंवार सैनिक कल्याण विभाग, पुणे यांना पत्रव्यवहार केलेला. सोबतच उच्च न्यायालयचा छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील व रुग्णालयातील विविध संवर्गातील पदे रिक्त न ठेवता वेळेत भरण्याचा व सदर भरतीला आचारसंहितेचा कोणताही अडसर येणार नसल्याचे निर्देश खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी शासनास, टीसीएस व डीएमईआर ला दिलेले. सदर खंडपीठाने स्पष्ट निर्णय दिलेले असूनही माजी सैनिक कोट्यातील रिक्त राहिलेल्या जागा रुपांतरीत करण्याकरीता सैनिक कल्याण विभाग, पुणे हे ना-हरकत प्रमाणपत्र देण्यास काही विषेश उद्देशार्थ दिरंगाई अथवा टाळाटाळ करत आहे. होणाऱ्या दिरंगाईमुळे सदर भरतीतील मेरिट लिस्ट कालबाह्य होऊ शकते. आणीबाणीच्या वेळी व कोरोना काळात रुग्णालयामध्ये अपु-या अधिपरिचारिकांच्या स्टाफ मुळे रुग्णांची झालेली हेळसांड व मृत्यु, नांदेड येथे 2023 मध्ये अपु-या स्टाफ मुळे लहान मुलांचे झालेल दुर्देवी मृत्यू व भंडाऱ्यात शासकिया रुग्णालयात झालेला अग्निकांड व महाराष्ट्रातील शासकिय रुग्णालयात 24 तासात 100 पेक्षा झालेल्या मृत्यु. भविष्यात अश्या आणीबाणी ची परिस्थिती केव्हाही येऊ शकते म्हणून रुग्णसेवेच्या दृष्टीने व समाजाच्या दृष्टीने अधिपरिचारिकांची पदे अत्यंत महत्वाची पदे असल्याने तब्बल 595 पदे रिक्त ठेवणे योग्य नाही. तसेच छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने 2024 मध्ये दिलेल्या निणर्यानुसार सुद्धा भरतीत जागा रिक्त ठेवू शकत नाही व रिक्त ठेवल्यास खंडपीठाची अवमानना होणार. वरील भरतीत मा. मुख्यमंत्री साहेबांनी यांनी विषेश लक्ष घालून 595 उमेदवारांचे होणारे नुकसान व समाजाचे होणारे नुकसान टाळण्याकरीता मा. संचालक, सैनिक कल्याण विभाग, पुणे यांनी अति तात्काळ माजी सैनिकांच्या रिक्त जागा भरण्याकरीता ना-हरकत प्रमाणपत्र शीघ्र यथाशीघ्र प्रदान करण्यात यावे. ना-हरकत प्रमाणपत्र करीता सैनिक कल्याण विभाग, पुणे
अजूनही टाळाटाळ करतील तर ज्याप्रकारे 2023 मध्ये निघालेल्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई, पनवेल महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग या भरतीमध्ये रिक्त असलेल्या माजी सैनिकांच्या जागेला सैनिक कल्याण विभाग, पुणे कडून ना-हरकत प्रमाणपत्र न घेता संबंधित विभागाने आयुक्ताला दिलेले प्रदत्त अधिकार वापरून माजी सैनिकांची रिक्त पदे भरलेले आहेत. त्याप्रमाणे मा. आयुक्त, वैद्यकिय शिक्षण व संशोधन संचालनालय (DMER) यांनी संबंधित विभागाने आयुक्ताला दिलेले प्रदत्त अधिकार वापरून तात्काळ माजी सैनिकांचे 595 रिक्त पदे तात्काळ भरून प्रतिक्षा यादीतीत अधिपरिचारीका उमेदवारांना नव्हे तर ख-या अर्थाने कोव्हीड योद्धांना न्याय देण्यात याव्या, अशी मागणी भारतीय विद्याथी मोर्चा, राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ या संघटनेनी केली आहे. सदर अधिपरिचारीका पदासाठी माजी सैनिकांचे 595 पदे तात्काळ रुपांतरित करून भरणेकरीता संघटनेकडून खालील तीन टप्यांमध्ये चरणबध्द आंदोलन हे शांततेच्या व संविधानिक मार्गाने केले जाणार आहे.1. दिनांक 21 मे, 2024 रोजी महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यातून मा. जिल्हाधिकारी मार्फत निवेदन. 2. दिनांक 24 मे, 2024 रोजी मा. संचालक, सैनिक कल्याण विभाग, पुणे यांचे विरोधात सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, रायगड इमारत, राष्ट्रीय युध्द स्मारकासमोर, सोलापूर रस्ता, घोरपडी, पुणे या कार्यालयासमोर दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत एक दिवसीय धरणे आंदोलन व निवेदने देणे.3. दिनांक 27 मे 2024 रोजी आझाद मैदान मुंबई येथे दुपारी 12 ते 5 वाजेपर्यंत एक दिवसीय धरणे व निवेदन देणे आंदोलन