“बुद्धजयंतीला ग्रंथ प्रकाशन सोहळा आयोजित…!”

अकोला : (दिनांक २१ मे,२४) –
स्थानिक प्रमिलाताई ओक सभागृह येथे गुरुवार दिनांक २३ मे, २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वा. बुद्ध जयंतीच्या मंगलदिनी प्रा.डॉ.एम.आर.इंगळे लिखित, ” भारतीय संविधान : मानवी हक्कांची सनद” या संविधानातील महत्वाचे अनुच्छेद व मूलभूत हक्क आणि आजची स्थिती याबाबत समिक्षणात्मक विश्लेषण करणाऱ्या महत्वपूर्ण ग्रंथाचा तसेच आयु. भीमराव बापूराव मोहोड लिखित “बहुजन क्रांतीगीते”* या बहुजनांना दिशादर्शक व प्रबोधनात्मक गीतांचा संग्रहग्रंथ आणि आयु.गजानन इंगळे लिखित “आंबेडकरी उपेक्षित कलावंतांचे अंतरंग” या आंबेडकरी चळवळीत महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या पण समाजाकडून उपेक्षित राहिलेल्या कलावंतांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारा ग्रंथ या तिन्ही ग्रंथांचा संयुक्त प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
सदर प्रकाशन समारंभाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ आंबेडकरी कवी आयु. आ. कि. सोनोने भूषविणार असून उद्घाटक म्हणून नथमल गोयनका विधी महाविद्यालय, अकोल्याचे प्राचार्य आयु. जी. व्ही. एगांवकर तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून आयु. विश्वनाथ शेगावकर, सेवानिवृत्त आय.ए.एस., चेन्नई उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमासाठी आंबेडकरी विचारवंत, लेखक तथा समीक्षक प्रा. डॉ. भास्कर पाटील व ज्येष्ठ पत्रकार, राज्यशास्त्राचे गाढे अभ्यासक प्रा.डॉ.मोहन खडसे यांची प्रमुख पाहुणे म्हणून तर समाज क्रांती आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आयु. हंसराज शेंडे, कारंजा व डॉ.संदीप भोवते, पंचफुलादेवी पाटील समाजकार्य महाविद्यालय खडकी, अकोला यांची प्रमुख उपस्थिती राहील.
सदर कार्यक्रमासाठी अकोल्यातील अभ्यासू, विचारवंत, संविधान प्रेमी, वाचक आणि समस्त बंधू भगिनी, प्राध्यापक, विधीज्ञ, विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक प्रा.राहुल माहूरे, प्रा.ऍड. आकाश हराळ, युवा वक्ता विशाल नंदागवळी, युवा कलावंत विक्की मोटे, आदित्य बावनगडे, विशाल इंगळे, अजिंक्य धेवडे, शुभम गोळे आणि नालंदा प्रकाशन अकोला यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.