अकोला ( दि ११ मे २०२४)-
स्थानिक अकोला येथील देशमुख फैल येथे वास्तव्यास असलेला विक्की मोटे यांची भूमिका असलेला
‘अवनी की किस्मत ‘ या चित्रपटाची आंतरराष्ट्रीय कान्स चित्रपट महोत्सवात स्क्रीनिंग साठी निवड झाली आहे. हा चित्रपट बीग कॅट फिल्म प्रस्तुत असुन दिग्दर्शन शॅानेट बरॅटो यांनी केले आहे. असित घोष आणि डायना घोष हे निर्माता आहेत.
विक्की मोटे हा श्री शिवाजी महाविद्यालय, अकोला चा विद्यार्थी असुन महाविद्यालयीन जीवनापासुनचं त्याचा कल नाटक आणि अभिनय या क्षेत्रात होता. तत्कालीन प्राचार्य
डॅा. सुभाष भडांगे, उप-प्राचार्य डॅा.एम.आर.इंगळे, डॅा संजय पोहरे यांनी त्याच्या कलेला नेहमी संधी उपलब्ध करुन दिली. त्याने अत्यंत कठिण परिस्थितीवर मात करुन विविध मराठी, हिंदी मालीका तसेचं चित्रपट आणि वेबसिरीज मध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर एक मानाचे स्थान बळकावले आहे.
आपल्या अकोलेकरांसाठी हि फार प्रतिष्ठेची आणि आनंदाची बातमी आहे. आपल्या विदर्भात भरपुर गुणवत्ता आहे. फक्त योग्य ते मार्गदर्शन आणि सुविधेचा अभाव असल्यामुळे थोडे जास्त परिश्रम कलाकारांना करावे लागतात. सिनेमा क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नसतांनाही या कलाकाराने आंतरराष्ट्रीय स्तरावर मजल मारली आहे. हि त्याच्या कसदार अभिनयाची पावती चं आहे.
आंतरराष्ट्रीय कान्स चित्रपट महोत्सव फ्रान्स येथील कान्स नावाच्या शहरात भरतो.
हा जगातला एक महत्त्वाचा चित्रपट महोत्सव आहे. येथे चित्रपट दाखवला जाणे हे सन्माननीय आहे. तसेच येथे मिळणारा कान्स उत्सव पुरस्कार हा महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे.
ऑलिम्पिक खेळानंतर हा महोत्सव जगातील सर्वात प्रसिद्ध कार्यक्रम आहे. सिनेमाच्या जगात, कान्स फेस्टिव्हल हा पहिल्या क्रमांकाचा कार्यक्रम आहे. जगभरातील जवळपास 30,000 उत्साही व्यावसायिक आणि 5,000 पत्रकार यासाठी हजर असतात.
विक्की च्या या यशाबद्दल चित्रपटातील सर्व कलाकारांचे आणि संपूर्ण टिम चे प्रा.दादाराव गायकवाड, महेंद्र डोंगरे, डॅा.मनोहर वासनिक, प्रा.प्रकाश गवई, प्रा.राहुल माहुरे, प्रा.ॲड. आकाश हराळ, विशाल इंगळे, विशाल नंदागवळी, अमीत लोंढे, राहुल कुरे, सुमेध पहुरकर, गिरीश जैन, अजिंक्य धेवडे, शुभम गोळे, आदित्य बावनगडे, आकाश जाधव, भरत चांदवडकर, सुमेध कांबळे यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.