स्थानिक:
श्री शिवाजी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय अकोला येथील मानसशास्त्र विभागातर्फे व्याख्यान सत्राचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अंबादास कुलट यांच्या मार्गदर्शनात दिनांक 6 एप्रिल रोजी करण्यात आले. आजच्या आधुनिक शिक्षण प्रणालीमुळे व धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती मानसिकतेने ग्रासलेला आहे व त्याचबरोबर विद्यार्थ्यांची शिक्षण विषयक भूमिका बदललेली आहे. सोशल मीडियाच्या नादात विद्यार्थी भरकटलेला असून विद्यार्थ्यांमध्ये स्व ला ओळखण्याची ताकद निर्माण व्हावी म्हणून या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अकोल्याचे सुप्रजीत प्रसिद्ध गायनॅकॉलॉजिस्ट डॉ.हर्षवर्धन मालोकार यांनी तारुण्यात इच्छा. ( डिझायर इन युथ ) या विषयावर विद्यार्थ्यांसोबत हितगुज साधून विद्यार्थ्यांनी तारुण्यात कुठल्या (डिझायर) इच्छांना आपलंस करून त्या साकार कराव्यात हे दुसरं कोणाच्या हातात नसून आपल्या स्वतःच्या हाती आहे असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी अकोल्यातील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ.सुजय पाटील व तसेच डॉ. राजेंद्र सोनवणे हे उपस्थित होते.
अमरावती विद्यापीठामध्ये पदवी आणि पदव्युत्तर मानसशास्त्र विषय शिकविला जातो. विद्यापीठा व्यतिरिक्त पदव्युत्तर शिक्षण हे शिवाजी महाविद्यालयात उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी आजच्या आधुनिक काळाची गरज पाहता त्या विषयांमध्ये प्रवेश घ्यावा असे आव्हान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना महाविद्यालयाचे आय क्यू ए सी कोऑर्डिनेटर डॉ.आशिष राऊत यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे मानव्यविद्या शाखाप्रमुख डॉ. नानासाहेब वानखडे, वाणिज्य शाखाप्रमुख डॉ. संजय तिडके , डॉ. डी.बी. वानखडे, डॉ. संजय पोहरे,प्रा. सुनील मावसकर, डॉ . संतोष पस्तापुरे प्रा. सचिन भुतेकर, डॉ. कपिला मैहस्ने, डॉ. श्रद्धा थोरात, प्रा. निलेश गावंडे, प्रा.दीपक वाघमारे, प्रा. मिलिंद बुजाडे यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरता मानसशास्त्र विषयाचे डॉ. संतोष पस्तापुरे यांच्या नेतृत्वाखाली मानसशास्त्र विषयाच्या सर्वच विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे संचालन कु. कोनिका वालेच्चा तर आभार प्रदर्शन वैभव आगलावे यांनी केले .