अकोला प्रतिनिधी : प्रशिक मेश्राम
अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. बच्चन सिंग साहेब यांचे संकल्पनेतुन व त्यांचे मार्गदर्शनात शहर वाहतुक नियंत्रण शाखा, अकोला व अकोला जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीत वाहतुक नियंमांचे उल्लंघन करणाने वाहन वाहन चालकांवर वेगवेगळ्या विशेष मोहीम राबविण्यात आल्या होत्या त्यामध्ये कलम १९८ मोवाका प्रमाणे बुलेट मोटार सायकल बनावटी सायलेन्सर वापुरून कर्कश व मोठ मोठे आवाज करून फटाके फोडणारे वाहन चालाकांवर बनावटी सायलेन्सरची विशेष मोहीम राबवीण्यात आली होती.
सदर मोहीमे दरम्यान शहर वाहतुक नियंत्रण शाखा, अकोला ५० बनावटी बुलेट सायलेन्सर जप्त करण्यात आले आहे. सदर जप्त बनावटी सायलेन्सर नष्ट करण्याकरीता मा.वि. कोर्ट यांची परवानगी घेवुन, मा. पोलीस अधीक्षक साहेब यांचे मान्यतेने श्री. सतीष कुळकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग, श्री. मनोहर दाभाडे उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग मुर्तीजापुर व श्री. सुनिल किनगे पोलीस निरीक्षक शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला यांचे उपस्थितीत दिनांक २२/०४/२०२४ रोजी दुपारी १२.०० वा शहर वाहतुक नियंत्रण शाखा, जुने पोलीस अधीक्षक कार्यालय अकोला समोरील आम रोडवर जप्त असलेले ५० बनावटी बुलेट सायलेन्सर रोड रोलर व्दारे नष्ट करण्यात आले व त्यांची कायदेशीर प्रक्रीया राबविण्यात आली.
करीता बुलेट वाहन धारकांनी आपल्या बुलेट वाहनाला कंपनी कडुन प्राप्त मुळ सायलेन्सरचाच वापर करावा बनावटी सायलेन्सर आढळून आल्यास यापुढे सुध्दा मोवाका प्रमाणे दंडात्मक कार्यवाही करून सायलेन्सर जप्त करण्यात येईल. वाहन धारकांनी वाहतुक नियमांचे पालन करावे, वाहन चालवितांना सोबत वाहनांचे कागदपत्रे बाळगावे व आपले वाहनावर पेंडीग दंड असल्यास त्वरीत वाहतुक पोलीस किंवा शहर वाहतुक कार्यालय येथे दंड भरावा, असे आवाहन मा. श्री. बच्चन सिंग साहेब पोलीस अधीक्षक अकोला यांनी अकोल जिल्हयातील नागरीकांना केले आहे.