अकोल्यात विकासाची गुढी उभारुया!ॲड. प्रकाश आंबेडकर

मराठी नववर्षाच्या जनतेला शुभेच्छा अकोला : आपल्याला अकोल्यात परिवर्तन घडवायचं आहे. हे घडविण्यासाठी आपल्या सर्वांची सोबत असणं गरजेचे आहे. या वेळेस जातपात न पाहता मतदान करा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून जनतेला केले आहे. सोबतच मराठी नववर्षानिमित्त गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देखील दिल्या. तसेच, अकोल्यात आपल्याला विकासाची गुढी उभारायची आहे. त्यासाठी आपण मदत कराल, असा विश्वास वाटतो, असेही त्यांनी म्हटले आहे.लोकसभा निवडणुकांचे वारे सध्या देशात आणि राज्यात वाहत आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर हे अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. अकोल्यातील राजकीय वातावरण भाजपच्या विरोधात असल्याने वंचित बहुजन आघाडीची ताकद पाहता अकोल्यात वंचित बहुजन आघाडी विजयाची गुढी उभारणार असा विश्वास जनतेतून व्यक्त होत आहे.—

Leave a Reply

Your email address will not be published.