दर्जेदार शिक्षण, उत्तम आरोग्य सेवा देण्यास शासन अपयशी – प्रा.अंजलीताई आंबेडकर

अकोला… शिक्षण, आरोग्य, पाणी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यास विद्यमान खासदार अपयशी ठरले आहे. अकोला जिल्ह्यात हा बदल घडवून आणणे अत्यंत गरजेचे आहे, यासाठी सर्वांनी एकजुटीने कामाला लागा आणि परिवर्तन करा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी केले.
मूर्तीजापुर तालुका संवाद दौऱ्यात त्या बोलत होत्या. मूर्तिजापूर तालुक्यातील समशेरपुर, जांभा, लखपुरी, सांजापुर हिरपुर,शेलु बाजार, बपोरी, कुरूम, हादगाव शिरताळा या ठिकाणी संवाद दौरा संपन्न झाला.
त्या म्हणाल्या की, वंचितांना बहुजनांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे. आणि मोफत मिळाला पाहिजे. या भागातील तरुणांचे शिक्षण झाले मात्र त्यांच्या हाताला काम नाही, म्हणून बेरोजगारांची संख्या कमालीची वाढली. गेल्या वीस वर्षापासून निष्क्रिय खासदार आपण निवडून देत आहोत. आता सतर्क होण्याची गरज आहे. ही लढाई सामान्य शेतकरी, वंचित, बहुजन घटकांची आहे. वीस वर्षापासून अकोल्यातील जनतेचा भ्रमनिराश होत आहे त्यामुळे विकास खुंटला. विकासाला गती द्यायची असेल तर परिवर्तन व्हायला पाहिजे असे मत अंजलीताई आंबेडकर यांनी व्यक्त केले. संवाद यात्रेला जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, प्रभाताई शिरसाट, संगीतरावजी कांबे, पुष्पाताई इंगळे, योगीताताई रोकडे, मायाताई नाईक, प्रतिभाताई अवचार, सुनील सरदार बाळासाहेब ठोकळ, अतुल नवघरे, सुनिल तामखान , प्रधान गुरूजी लक्ष्मीबाई वानखेडे, रौदले यांच्यासह मोठ्या प्रमाणात ग्रामीण महिला पुरुषांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published.