अकोला जिल्हयातील १० वा धोकादायक इसम एम.पी.डी.ए. अॅक्ट अन्वये एक वर्षाकरीता स्थानबध्द.

अकोट शहरातील, ईफ्तेगार प्लॉट येथे राहणारा कुख्यात गुंड शाकीर खान बिस्मिल्ला खान, वय ३४ वर्ष, याचे वर यापुर्वी जबरी चोरी, दुखापत हमला किंवा गैरनिरोध करण्याची पूर्वतयारी करून गृहअतिक्रमण करणे, इच्छापूर्वक जबर दुखापत पोहचविणे, घातक हत्यारांनी किंवा साधनांनी इच्छापूर्वक दूखापत पोहचविणे, गैरनिरोध, शांतताभंग घडवून आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे, फौजदारीपात्र धाकदपटशा करणे, बेकायदेशिर रित्या शस्त्र बाळगणे असे बरेच गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचे वर यापुर्वी विवीध कलमान्वये प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली होती, परंतु त्याचे वर त्याचा काहीच परिणाम झालेला नव्हता. तो प्रतिबंधक कार्यवाही करून सुध्दा जुमानत नसल्याने त्याचे विरूध्द गंभीर दखल घेण्यात येवुन कुख्यात शाकीर खान बिस्मिल्ला खान, याचे गुन्हेगारी वृत्तीस आळा बसावा याकरीता मा. पोलीस अधीक्षक, अकोला यांनी त्यास स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव मा. जिल्हादंडाधिकारी, अकोला यांना सादर केला होता. मा. जिल्हादंडाधिकारी, श्री. अजित कुंभार यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून तसेच स्वतःचे स्त्रोताव्दारे माहीती मिळवुन सदर कुख्यात गुंड हा धोकादायक व्यक्ती असल्याची खात्री झाल्याने त्यास एकवर्षा करीता अकोला जिल्हा कारागृहात स्थानबध्द ठेवण्याबाबतचा आदेश दि. २६/०३/२०२४ रोजी पारीत केला.

मा. जिल्हादंडाधिकारी, सा. अकोला यांचे आदेशावरून शाकीर खान बिस्मिल्ला खान याचा तात्काळ शोध घेवुन त्यास सदरचा आदेश तामील करून त्यास दिनांक २७/०३/२०२४ रोजी जिल्हा कारागृहात स्थानबध्द केले.

सदरची कार्यवाही पुर्ण करण्याकरीता मा. पोलीस अधीक्षक, श्री. बच्चन सिंह यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक, अभय डोंगरे, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल, स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस निरीक्षक शंकर शेळके, पोउपनि. आशिष शिंदे, पोहेकॉ. ज्ञानेश्वर सैरिसे, पोकॉ. उदय ईश्वरीप्रसाद शुक्ला, तसेच पो.स्टे. अकोट शहर येथील पोलीस निरीक्षक तपन कोल्हे, पोहेकॉ. नंदकिशोर कुलट यांनी परिश्रम घेतले.

‘अकोला जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहुन शांतता राहावी याकरीता अशा प्रकारचे गुन्हे करणारे व कारवाईस न जुमानणा-या सराईत गुन्हेगारांवर येणा-या निवडणुका, आगामी सण उत्सव काळात एमपीडीए व इतर प्रचलित कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे “असा इशारा जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.