अकोला ( दि २४ मार्च २०२४)-
स्थानिक सार्थक वक्तृत्व अकॅडमी च्या वक्तृत्व कला प्रशिक्षणाच्या समारोपीय कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणुन बोलतांना शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाचे
डॅा सुमेध कावळे यांनी वरील प्रतिपादन केले. याप्रसंगी विचारपिठावर समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्रदीप शिरसाट, प्रमुख उपस्थीती मध्ये प्रा. राहुल माहुरे, प्रा. ॲड. आकाश हराळ तसेचं सार्थक वक्तृत्व अकॅडमीचे संचालक विशाल नंदागवळी उपस्थीत होते.
पूढे बोलतांना त्यांनी सांगीतले की, वक्तृत्व हे कला आणि शास्त्र दोन्ही आहे ते अवगत करण्यासाठी नियमीत सराव आणि अथक परिश्रम करावे लागतात. वक्तृत्वाला फार मोठी परंपरा लाभली आहे. वक्तृत्वाने चं नेतृत्व घडते. म्हणून प्रत्येक व्यक्तीने ही कला जोपासली पाहिजे.
कार्यक्रमाची सुरुवात महामानवांच्या प्रतिमा पूजनाने व हारार्पनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रसाद नालट यांनी केले. त्यानंतर सहभागी प्रशिक्षणार्थी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आणि स्वत:च्या वक्तृत्वात कशी सुधारणा झाली ते सांगीतले. प्रा राहुल माहुरे व प्रा ॲड आकाश हराळ यांनी शुभेच्छा पर भाषणे केली. मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षणार्थी यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्रदीप शिरसाट यांनी सांगीतले की, आजच्या स्पर्धेच्या युगात वावरतांना आपल्याला प्रत्येक कला आणि कौशल्य अवगत असणे आवश्यक आहे. आजच्या बदलत्या काळानुसार आपणाला स्वत:मध्ये बदल करावे लागतील असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप मेश्राम यांनी तर आभार प्रदर्शन स्वराज समदुर यांनी केले.