बुलढाणा बुध्दिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क द्वारे
बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर १७ मार्च रोजी विशाल घडक महामोर्चा होत आहे भोन येथील प्राचीन मौर्यकालिन बुद्ध स्तुप वाचवण्यासाठी संवर्धन व ऊत्खनाबाबत जिल्हाधिकारी बुलढाणा यांना कळविले असता अध्यापही कोनतेच लेखी ऊत्तर प्राप्त झाले. नाही. तसेच सम्राट अशोक काळात ८४ हजार बौध्द स्तुपांपैकी एक अतिषय महत्वाचा स्तुप संग्रामपुर तालुक्यातील भोन येथे सापडला असून ह्या संदर्भात २००६ मध्ये डेक्कन कॉलेजचे डॉ. देवतारे यांनी संशोधन करून तो जगासमोर आन- ला. यासंदर्भात सरकार कडे बुध्दिष्ट इंटरनॅशनल संघटनेकडून पाठपुरावा करने सुरू आहे. तसेच २०१९ मध्ये शेगांव येथे राज्यस्तरीय भोन स्तुप वा- चवा महामेळावा घेण्यात आला असता तत्कालीन महाराष्ट्र राज्य सरकारने ५०९ कोटी रूपये निधी भोन स्तुप संवर्धन उत्खनन करण्यासाठी घोषीत केला होता तो अद्यापही खर्च झाला
नाही ऊलट जिगाव प्रकल्प धरनाचे काम झपाट्याने होत आहे. त्यामुळे भोन स्तुप नष्ट होवू शकतो हा संशय आहे कारण येना-या पावसाळ्यात जर पाण्याने मुसुंडी मारली तर या ठिकाणी पाणि हे स्तुपात शिरल्याची १००% संधी आहे परंतू संध्याची शासकीय प्रशासकिय यंत्रना दुर्लक्ष करित असल्याचे दिसून येत आहे. हा स्तुप गेल्या २००२ पासून जगासमोर आला आज २०२४ ऊलटून सुध्दा तब्बल २२ वर्षे झाली तरीही सरकार
याकडे जानीवपूर्वक दुर्लक्ष करत
आहे हे यावरून सिध्द होते. तरी या घटनेचा तिव्र निषेध करीत बुध्दिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क च्या वतीने १७ मार्च २०२४ रोजी घटनेचा निषेध व सरकारचे डोळे उघडण्याकरीता भोन स्तुप वाचवीण्यासाठी संवर्धन, संरक्षण, उत्खनन होण्यासाठी हा राज्यस्तरीय महामोर्चा होत आहे. असे सुजित बांगर यांनी अकोला येथील शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या बैठकीत बोलत असतांना बहुजन समाजबांधवाना महामोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.