शिवाजी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन संपन्न…

मराठी साहित्याचे वाचन-लेखन पिढी समृध्द करणारे आहे- प्राचार्य डॉ.अंबादास कुलटजिल्हाधिकारी कार्यालय,अकोला व मराठी विभाग श्री शिवाजी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने २७ फेब्रुवारी कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंबादास कुलट, तर उद्‌घाटक म्हणून मा.अनिल माचेवाड, उपजिल्हाधिकारी तथा मराठी भाषा अधिकारी, हे अनुपस्थित असल्यामुळे मा.शिवहरी थोंबे, नायब तहसिलदार हे उपस्थित होते. तर प्रमुख उपस्थितामध्ये मानव्यविद्या शाखा प्रमुख डॉ.नाना वानखडे, डॉ.संजय पोहरे मराठी विभाग प्रमुख, डॉ.आनंदा काळे समाजशास्त्र विभाग प्रमुख, ज्योतीताई नारगुंडी, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला हे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने व प्रतिमा पूजनाने मान्यवरांनी केली. यावेळी वैभवी गवई या विद्यार्थीनीने सुरेश भटांच्या मराठी गौरव गीताने केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संजय पोहरे यांनी केले यामध्ये मराठी भाषेच्या संवर्धन व संरक्षणासाठी मराठीची उज्वल परंपरा उलगडून दिली. आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये मराठी भाषेचा जास्तीत-जास्त वापर आपण करणे जरूरी आहे असे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ.अंबादास कुलट म्हणाले- मराठी भाषा समृध्द करणाऱ्या अनेक कवी,साहित्यिकांपैकी कुसुमाग्रज उर्फ वि.वा.शिरवाडकर ज्ञानपीठ पुरस्कार विजेते त्यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा होत आहे. त्यानिमित्त त्यांच्या कवितांचे, नटसम्राट नाटकांचे आणि आदी साहित्याचे वाचन आजच्या पिढीला मार्गदर्शक व दिशादर्शक असे आहे. असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमात डॉ.आनंदा काळे यांनी आपला मराठी भाषा अभ्यासाचा प्रवास ओघवत्या शैलीत मांडला. आणि म्हणी-वाक्प्रचार हे भाषेचे सौंदर्य कसे आहे ते उदाहरणासह विशद केले. यावेळी त्यांनी स्वलिखित आपली कविता सादर केली. यावेळी काही विद्यार्थ्यांनी आपल्या कविता सादर केल्या त्यामध्ये मयुरी वाहाने, सुरज डोंगरे, संचिता चव्हाण, प्रा.प्रजक्ता सवाई, प्रा.गणेश मेनकार आदींनी आपल्या कविता सादर केल्या. कार्यक्राचे बहारदार संचालन स्वराज समदूर याने तर आभार प्रदर्शन नेहा तायडे हिने केले. यावेळी डॉ.डी.बी.वानखडे, डॉ.कपिला म्हैसने, डॉ.संजय काळे, डॉ.प्रवीण वाघमारे यांची प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठी वाड.मय मंडळाच्या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.