स्व. वसंत देसाई स्टेडियम अकोला येथे दि. 6 ते 7 मार्च 2024 रोजी श्री छत्रपती शिवाजी स्पोर्टिंग क्लब तर्फे भव्य विदर्भस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती .या स्पर्धेत विदर्भातील उत्कृष्ट 16 संघांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून डॉ.अंबादास कुलट (प्राचार्य,श्री शिवाजी महाविद्यालय अकोला) उद्घाटक म्हणून मा.नीरज भाऊ गायकवाड (लोकसभा प्रमुख प्रहार जनशक्ती पार्टी अकोला) प्रमुख अतिथी मा. सतीशचंद्र भट सर( जिल्हा क्रीडा अधिकारी अकोला) मा. प्रशांत गावंडे सर ( रिऑन ट्रेडिंग अकॅडमी ) मा.हाजी अब्दुल मुनाफ ठेकेदार (संचालक मेहक मेडिकल अकोला) मा.पवन भाऊ वर्गे( युवा सरपंच चिंचोली महारुद्रायणी फाउंडेशन अकोला) मा. पवन दादा महल्ले ( अध्यक्ष,युवा मोर्चा महानगर अकोला) प्रमुख पाहुणे म्हणून मा.संजय काळे (विभाग प्रमुख शारीरिक शिक्षण विभाग श्री शिवाजी महाविद्यालय अकोला)मा. तुषार दादा नेवारे , मा. जयेश ओरा, मा. अभिजीत शेंडे , मा. जय दादा गिरे , मा. मोहम्मद सईद कुरेशी, मा. शुभम गोळे, मा.संतोष भाऊ चौधरी, मा. नितीन वाघमारे , यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन समारंभ संपन्न झाला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.निशांत वानखडे यांनी केले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शुभम तेलगोटे, अभिलाष बडगे, शोभित शेंडे, समर्पण गजभिये, आनंद मस्के, रोहित पवार, सुमेध कांबळे, हर्ष बुंदेले, ऋषी शिरसाट , साहिल इंगळे, यश गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अथक प्रयत्न केले.सर्व संघाची निवास व राहण्याची व्यवस्था मंडळानी केली होती.
स्पर्धेचा निकाल –
प्रथम पारितोषिक 2100/ — अमरावती बाॅईज संघ
व्दितीय पारितोषिक 15000/— अमर क्रीडा मंडळ बडनेरा
तृतीय पारितोषिक 11000/— एस बी एम परतवाडा