वय अवघे २४ वर्ष, शिक्षण मास्टर ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट, प्रोफेशन अकाऊंट टिचर अशी ओळख असलेल्या गोरा मेरो दमक युक्तीचे सामाजिक कार्य खरोखरच जातिवा वाखाणण्याजोगे आहे. तिच्या या कार्यावर एक नजर…
सामाजिक कार्य :
» “संविधान प्रचारक लोकचळवळ’ या संघासह कार्यशाळा आणि शिबिरे आयोजित करून गाव, शाळा, महाविद्यालयांमध्ये संविधान जागृती कार्यक्रम राबविण्याचे कार्य.
- मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी “२१ पदकांचा उत्सव” असे विविध कार्यक्रम राबवणे ज्या अंतर्गत मुलांसाठी चित्रकला, गायन, वक्तृत्व, प्रश्नमंजुषा स्पर्धाचे आयोजन तसेच शिवजयंती निमित्त चित्रकला व वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन.
मेळघाटातील आदिवासी लोकांकरिता दरवर्षी दिवाळी निमित्त एक दिवसाच्या “सामाजिक दिवाळी” मोहिमेसाठी कार्य करते जिथे माझी टीम त्यांना कपडे आणि मिठाई दान करते. तसेच मासिक पाळी आणि सॅनिटरी नॅपकिन्सच्या वापराबाबत आदिवासी भागातील महिलांमध्ये जागृती निर्माण करणे, * ती अकोला जिल्ह्यातील “मतदार जागृती कार्यक्रम” चा भाग आहे.
22 सामाजिक शिबिरांमध्ये स्त्री पुरुष समानता जागरूकता व्याख्यान करते.
महाराष्ट्रातील सर्वोत्तम वक्तृत्व स्पर्धेपैकी एक “छत्रपती करंडक समिती” ची सदस्य.
व्हिजन ग्रीन अकोला अभियानाचे सदस्य.