अकोला शहरात सुरक्षात्मक उपाय योजना म्हणुन मा. पोलीस अधीक्षक, श्री बच्चन सिंह यांचे नाविन्यपुर्ण उपक्रमा सोबतच सर्व सामान्य नागरीकांच्या सुरक्षेसाठी नविन संकल्पना राबवत असतात त्या अनुषंगाने आज दिनांक ०१.०३.२०२४ रोजी ११.०० वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय, विजय हॉल येथे अकोला शहरतील तसेच अकोला जिल्हयातील बॅक व्यवस्थापक व सराफा असो. यांचे सोबत चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पो.नि शंकर शेळके स्थानिक गुन्हे शाखा यांनी केले. चर्चा सत्राचा उददेश उपस्थितांना समजावुन सांगीतला सदर चर्चा सत्रामध्ये सुरक्षा संबंधाने विविध विषयावर चर्चा करण्यात आली. शहर व ग्रामिण विभागात, किती शाखा व एटीएम आहेत. तसेच नेमण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकांचे पुर्ण गाव व पत्ता तसेच कोणत्या एटीएम वर नेमणुक करण्यात आली आहे. कॅश व्हॅन वर असलेल्या चालक व सुरक्षा रक्षक यांचे संपुर्ण नाव पत्ता व मोबाइल नंबर तसेच जिल्हयातील सराफा व्यवसायीक सुरक्षेच्या दृष्टिकोनातुन किती सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सराफा दुकानाचे सुरक्षेच्या दुष्टिकोनातुन रात्रीचे वेळी शहरी व ग्रामिण भागात सुरक्षा रक्षक नेमले आहेत किंवा कसे सराफा दुकानावर अर्स्ट यंत्र बसविण्यात आले आहे काय त्याबाबतच्या गोष्टींचा पोलीस अधीकांनी संपूर्ण आढावा घेवुन सुरक्षा संबंधी काय उपाय योजना करता येतील या दृष्टीने सकारात्मक चर्चा केली.
त्यानंतर येणा-या अडचणी वर चर्चा करतांना सायबर फसवणुक हा सद्य स्थितीत गंभीर विषय झाला आहे त्यासाठी सर्व स्तरावरून जनजागृती कशी करता येईल तसेच असा प्रकार झाल्यास तात्काळ N.C.C.R.P. पोर्टल चा वापर करून आपण आपली तक्रार नोंदवावी या बाबत पोलीस अधीक्षक यांनी मार्गदर्शन केले. सर्व बैंक व सराफा व्यवसाईक यांना सिसिटीव्ही कॅमेरे लावण्याबाबत सुचना दिल्या. अकोला शहरातील सराफा बाजार तसेच बॅक परिसरात पुरेशी पोलीस गस्त वाढविण्याबाबत सर्व ठाणे प्रभारी यांना आदेशीत करण्याचे निर्देश दिले. सदर चर्चासत्राकरीता सराफा असो. १४ बँक व्यवस्थापक व प्रतिनिधी यांची उपस्थिती होती.