अकोला जिल्हा पोलीस दलाकडून विविध उपक्रम राबविले जातात त्यापैकी आज दिनांक २६.०२.२०२४ रोजी पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह यांचे संकल्पनेतुन “सर्व धर्म सद्भावना संमेलन” व शांतता समीती चर्चा सत्र या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस लॉन अकोला येथे करण्यात आले. जातीय सलोखा वृध्दींगत व्हावा सर्व धर्म समभावाची शिकवण प्रत्येका पर्यंत पोहचवावी हा उददेश ठेवुन शांतता समीती सदस्य यांना सदर कार्यक्रमाला निमंत्रीत करण्यात आले होते.
मा. श्री अजित कुंभार जिल्हाधीकारी, अकोला यांनी जनतेला मिळालेल्या वाईट संगती मुळे, किंवा सोशल
मीडिया च्या दुरूपयोगामुळे मुळे, धार्मिक भावना जाणून बुजून हेतू पूर्वक मेसेजकरून भडकविण्यात येतात, खोट्या अफवा,
पसरवीण्याचे काम काही समाज कंठक लोक करीत असतात, यामध्ये सर्वसामान्य पणे तरुण गुरफटल्या जातो, आपले
भविष्याचे स्वप्न साकारणारे हे तरुण आपले जीवन अंध:कारमय करून बसतात, म्हणून हा विषय समजावून सांगत सोशल मिडीया चा वापर कसा कराव याबाबत मार्गदर्शन केले जास्तीत जास्त तरूणांपर्यन्त हा संदेश पोहचविण्याचे आवाहन केले पोलीस दलाच्या उपक्रमाला शुभच्छा दिल्या. मा. श्री बच्चन सिं: पोलीस अधीक्षक, अकोला यांनी आपले मत व्यक्त करतांना आपण एक दक्ष नागरिकांची भूमिका पार पाडण्यासाठी सक्षम, सतर्क, सुरक्षित समाज घडविण्यासाठी व अकोला जिल्हयात जातीय सलोखा कायम रहावा या साठी सदैव प्रयत्नरत राहुया व अकोला जिल्हयाचे गाव शांतता प्रिय जिल्हा म्हणून नविन ओळख निर्माण करूया. अकोला
पोलीस सुदधा आपल्या कायदेशीर बाबी संभाळुन वेगवेगळया सामाजीक उपाय योजना करीत आहे त्यासाठी आपले सर्वांचे
सहकार्य अपेक्षीत आहे. आपले सेवेसाठी अकोला जिल्हा पोलीस संदैव तत्पर आहे. असे मत व्यक्त केले.
मा. मुफती हाजी गुलाम मुरत्फा साहाब यांनी सर्वाना आर्शीवाद देत भाईचारा कायम ठेवुन सर्व धर्मा मध्ये अशा कार्यक्रमाच्या माध्यमातुन समन्वय साधता आला त्याबददल अकोला पोलीसांचे आभार मानले. मा. मुक्ती जकीउल्ला साहाब, अकोला मा. शेख गुरूजी गुरुदेव सेवा मंडळ, अकोला, मा. श्रीकृष्ण सावळे गुरूजी गुरूदेव सेवा मंडळ, अकोला मा. रेव्ह मोजस वानखडे, इलोहिम अलायन्स चर्च, अकोला मा. भदन्त धम्मानंद धमरत्न विपस्सना केंद्र, मलकापुर अकोला मा. पंडीत रविंद्र जैन मा. रविंद्रजसिंगजी ज्यानी गुरुव्दारा कमीटी, अकोला, मा. इफतीयास अहमद माना यां सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. व सर्वानी अकोला जिल्हयात शांतंता नांदण्यासाठी सर्वानी प्रयत्नरत राहण्याबाबत सर्व शांतता समीती सदस्य यांना आवाहन केले.
सदर कार्यक्रमाची सुरुवात ही पाहुण्याच्या स्वागतागे झाली. मा. गोकुलराज जी. सहायक पोलीस अधीक्षक, बाळापुर विभाग मा. सतिश कुलकर्णी व उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुवतीला पोलीस हवालदार गोपाल मुकुंदे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सोबतव कार्यक्रमाचा उद्देश प्रास्तावीकातुन सांगीतला. मपोका भाग्यश्री मेसरे हिने देशभक्तीपर गित गावुन सर्वांची मने जिंकली त्यांनतर सदर कार्यक्रमाचे आभार राखीव पोलीस निरीक्षक गणेश जुमनाके यांनी केले. संचालन प्रसिध्द गझलकार गोपाल गापारी यांनी केले, तसेच अकोला शहरातील सर्व ठाणेदार, जिल्हयातील शहरविभाग, अकोट विभाग, गुर्तीजापुर विभाग, बाळापुर विभागतीलअसे एकुण ३५८ शांतता समिती महिला व पुरुष सदस्य, यांची उपस्थिती होती.



