विदर्भ स्तरीय भव्य शरीर सौष्ठव स्पर्धा आंबेडकर श्री २०२४ चे आयोजन

पत्रकार परिषदेत दिली माहिती…

आजच्या युगात तरुण व्यसनाकडे वळताना दिसत आहे. गुटखा, दारू,सिगारेट सारख्या व्यसनामुळे तरुणांचे जीवन धोक्यात जात आहे. तेव्हा व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न म्हणून साहसी खेळाकडे वळविण्यासाठी आकर्षण निर्माण व्हावे व तरुणांना सुदृढ व निरोगी आरोग्य लाभावे या उद्देशाने आंबेडकर श्री २०२४ या शरीर सौष्टव स्पर्धेचे आयोजन गेल्या 9 वर्षापासून करत आहोत. तेव्हा दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी प्रबुद्ध भारत बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आंबेडकर श्री 2024 या भव्य विदर्भ स्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन दिनांक 24 फेब्रुवारी 2024 रोजी वसंत देसाई स्टेडियम अकोला येथे करण्यात आले आहे. ज्यामध्ये विदर्भातील नामवंत बिल्डर येणार असून भव्य असे पारितोषिके ठेवण्यात आली आहे.

‘आंबेडकर श्री 2024’ हे टायटल प्राप्त करणाऱ्या स्पर्धकाला 21,000/- रोख, आकर्षक चषक आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. ‘बेस्ट पोजर’ ठरणाऱ्या स्पर्धकाला 11,000/- रोख, आकर्षक चषक आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. सोबतच प्रत्येक वजन गटात प्रथम,द्वितीय,तृतीय आणि प्रोत्साहनपर 11,000/-, 7,000/-, 5000/-, 3,000/-, 2,000/- रोख, आकर्षक स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. कार्यक्रमाच्या उद्घाटन स्थानी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय युवा नेते सुजात आंबेडकर, प्रमुख अतिथी म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वंचित बहुजन युवक आघाडीचे राज्य प्रवक्ते राजेंद्र पातोडे राहतील. सोबत प्रमुख उपस्थिती म्हणून अशोकराव सोनोने (प्रदेश अध्यक्ष:भारिप बहुजन महासंघ) अभय डोंगरे (अप्पर पोलीस अधीक्षक अकोला) मीनाक्षी गजभिये(अधिक्षक : जिल्हा सामान्य रुग्णालय अकोला) डॉ. आशुतोष डाबरे (अस्थिरोग तज्ज्ञ) प्रा. संजय खडसे(उपविभागीय अधिकारी दारव्हा) बळवंत रखराव (उपविभागीय अधिकारी अचलपूर) पुष्कर ढवळे (संचालक ट्रॅक्टर मॅसी फर्ग्युसन) राहुल तायडे (तहसीलदार मलकापूर) शंकरराव शेळके (स्थानिक गुन्हे शाखाप्रमुख) खुरेंद्र तिडके (समाज कल्याण अधिक्षक) प्राचार्य, डॉ. समाधान कंकाळ (आयुर्वेदिक महाविद्यालय,अकोला) संतोष महल्ले (ठाणेदार देवुळगाव राजा) सतीश चंद्र भट ( क्रीडा माहिती अधिकारी) प्रा. राजेंद्र डोंगरे ( प्रा. अमरावती) अनिल यादव (सामाजिक कार्यकर्ते) संग्राम गावंडे (अध्यक्ष विदर्भ बॉडी बिल्डर) राहुल भगत ( भगत ज्वेलर्स अकोला) आदी मान्यवर उपस्थित राहतील. तेव्हा अकोला जिल्ह्यातील नागरिकांना कार्यक्रमाला येण्याचे आवाहन आयोजक महेंद्र डोंगरे( अध्यक्ष प्रबुद्ध भारत बहुउद्देशीय संस्था अकोला, संपादक वंचितांचा प्रकाश साप्ता.) केले आहे. तेव्हा प्रा. राहूल माहूरे, प्रा. आकाश हराळ, विशाल नंदागवळी, प्राशिक मेश्राम, आदित्य बावणगडे, नितीन सपकाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.