रुग्णाने मानले जी.एम.सी चे आभार…..

अकोला : नेहमी वादग्रस्त असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला आज रुग्णाने कौतुक केले. रुग्ण सुनील गुरू यांच्या नातेवाईक यांचा रुग्णसेवक आशिष सावळे यांना रुग्णाचा रात्री कॉल आला. आम्ही तीन दिवस झाले खाजगी हॉस्पिटल ला ऍडमिट आहोत. परंतु आम्हाला येथे काही फरक पडत नाही आहे, आणि रुग्णाची तब्येत खराब होत आहे. आम्ही काय करायचं समजत नाही. रुग्णसेवक आशिष सावळे यांनी ताबडतोब रुग्णाचे कागदपत्र पाठवायला सांगितले. आणि ते कागदपत्र डॉ सुमेध दुळधुळे यांना दाखवले व त्यांच्या सोबत चर्चा करून त्यांनी आम्हाला अर्जंट मध्ये डायलिसिस करावे लागेल असे सांगितले. किडनी जास्त प्रमानात खराब झाली आहे. त्यामुळे तुम्हाला डायलिसिस करणे भाग आहे असे डॉ सुमेध धुळधुळे यांनी सांगितले. नंतर त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये रात्री 11. वाजता अपघात कक्ष मध्ये आणले त्यांच्या काही तपासण्या केल्या गेल्या.
ते सगळे तपासणी करून डॉक्टर यांनी वॉर्ड नंबर 31 मध्ये ऍडमिट केले. दुसऱ्या दिवशी वैद्यकीय अधिकारी यांनी आम्हाला रुग्णाची माहिती दिली व मार्गदर्शन केले. आणि आपण उद्या पासून डायलिसिस करू काळजी करू नका असे म्हणून आमचे मनोबल वाढवले.
सकाळी 9 वाजता आम्ही डायलिसिस ला गेलो तिथे डॉक्टर व अधीपरीचारिका यांनी खूप गोड, सोनू भाषा मध्ये आम्हाला मार्गदर्शन केले. अशा प्रकारे रुग्णाचे 5 डायलिसिस झाले. जाता जाता रुग्णांच्या डोळ्यात पाणी आले, ताज मी जे काही आहे, उभा आहे ते फक्त तुमच्या मुळे आहे. रुग्णसेवक ही किती महत्वाची भूमिका पार पाडतात ते आज च्या प्रसंगाने लक्षात आले त्यामुळे रुग्णसेवक हे डॉक्टर आणि रुग्ण यांच्या मधील दुवा आहेत. रुग्ण सुनील गुरू यांनी लेक्चरल डॉ. फैजान अहमद अन्सारी नेफ्रोलोझिस्त, वैद्यकीय अधिकारी स्वप्नील वाईंनदेशकर, अधीपरीचरिका यामीनी कोटणीस, सिस्टर जया तायडे, टेक्निशियन शेख सादीक, नंदकिशोर बाजड, रिता देशमुख, तसेच महात्मा ज्योतिबा फुले योजने चे अधिकारी डॉ. विरवानी आणि विशेष रुग्णसेवक आशिष सावळे यांचे विशेष आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.