अकोल्यामध्ये ग्राहक संरक्षण समितीची कार्यकारिणी गठीत.
राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री संजय पाठक कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित.
गणेश शेंडे..वंचितांचा प्रकाश वृत्तसेवा.
अकोला. दि.8.
राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री संजय पाठक यांच्या प्रमुख उपस्थितीत अकोला येथील सलाम नगर येथे ग्राहक सौरक्षण समितीची बैठक दि.4 फेब्रुवारी रोजी पार पडली.
सदर बैठकीमध्ये समितीच्या पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.ह्यामध्ये संघटनेच्या जिल्ाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ता श्री गणेश शेंडे यांची निवड करण्यात आली.त्याचप्रमाणे जिल्हा महासचिव पदी नौशाद खान समद खान, जिल्हा संघटक सचिव पदी इम्रान खान पठाण जिल्हा उपाध्यक्ष पदी अमजद खान उस्मान खान , महानगर संगठन सचिव पदी संजय अण्णा, शेख महेबुब शेख अनवर यांची महानगर उपाध्यक्ष पदी,शेख अहमद यांची प्रभाग प्रमुख पदी मोहम्मद साजिद मो. शाफिक कुरेशी यांची महानगर उपाध्यक्ष पदी ,शेख महेबुब शेख शब्बीर यांची संपर्क प्रमुख पदी निवड झाली.
सदर कार्यक्रमाला अकोटफैल भागातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात राष्ट्रीय अध्यक्ष यांनी ग्राहकाचे अधिकार व हक्क समजाऊन सांगितले तसेच जिल्हाध्यक्ष यांनी जिल्ह्यातील तमाम जनतेला कोणत्याही क्षेत्रातील ग्राहकाची लुबाडणूक जर होत असेल तर संघटनेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.

