वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या आद. प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात अकोला जिल्ह्यातील सरपंच व उपसरपंच यांचा संवाद मेळावा स्थानिक कर्मचारी भवन अकोला येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला संबोधित करतांना वंचित बहुजन आघाडीवर अधिकृतरित्या आपण ग्रामपंचायत निवडणुकीत उतरलो व जनतेने वंचित बहुजन आघाडीला प्रथम पसंती देत जिल्हाभरात प्रचंड ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या सरपंच पदाच्या उमेदवाराला थेट जनतेतून निवडून दिले. या जनतेच्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही. अकोला जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीचा विकास करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी वचनबद्ध आहे असे वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या आद.प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी प्रमुख मार्गदर्शन करतांना म्हटले. तर यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलींद इंगळे, महिला जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट, जि. प. अध्यक्ष संगीताताई अढावू, उपाध्यक्ष सुनील फाटकर, गटनेते ज्ञानेश्वर सुलताने , शिक्षण व आरोग्य सभापती मायाताई नाईक, कृषी व पशुसंवर्धन सभापती योगीताताई रोकडे, महिला व बालकल्याण सभापती रिजवाना परवीन, महिला जिल्हा महासचिव शोभाताई शेळके, निलोफर शहा, सह जिल्हा प्रसिध्दी प्रमुख विकास सदांशिव तसेच सर्व तालुकाध्यक्ष मंचावर उपस्थित होते. या संवाद मेळाव्याचे प्रास्ताविक जिल्हा महासचिव मिलींद इंगळे यांनी तर सूत्रसंचालन अकोला तालुकाध्यक्ष किशोर जामणिक यांनी आणि आभार मुर्तिजापूर तालुकाध्यक्ष सुनील सरदार यांनी मानले. संवाद मेळाव्याला जिल्ह्यातील शेकडो सरपंच व उपसरपंच यांची उपस्थिती होती.


