पोलिस प्रशासनाला जाब विचारत करून घेतले गुन्हे दाखल..
स्थानिक:
अकोला जिल्हयातील महिलांवरील अत्याचाराची मालिका थांबण्याचे नावाचं घेत नाही आहे. त्यात आणखी एक भर म्हणून डाबकी रोड पोलिस स्टेशन हद्दीत अशीच एक महीला अत्याचाराची घटना घडली असून पोलिस प्रशासनाने या प्रकरणात हलगर्जीपणा दाखवल्यामुळे पिडित महीलेला न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन महिला आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला.
पिडीत महिलेला न्याय मिळावा यासाठी एफ. आय. आर. नोंदवून वाढीव विनयभंगाची कलम दाखल केली. परंतु त्याला अटक होईपर्यंत वंचित बहुजन महिला आघाडी गप्प बसणार नाही असा इशारा यावेळी प्रदेश महासचिव मा. अरूंधतीताई शिरसाट यांनी दिला. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट,महानगराध्यक्ष वंदनाताई वासनिक, जि. प. अध्यक्ष संगीताताई आढावू, शिक्षण व आरोग्य सभापती मायाताई नाईक, माजी समाजकल्याण सभापती आकाश शिरसाट, विकास सदांशिव, महिला महानगर महासचिव ज्योती खिल्लारे, पश्चिम युवा महानगराध्यक्ष आशिष मांगुळकर, विद्या अंभोरे, व्दारकाबाई शिरसाट यांच्यासह जिल्हा व महानगर महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.