श्री शिवाजी महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न..
स्थानिक:
श्री शिवाजी कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,अकोला येथे ६ डिसेंबर २०२३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६७ वा महापरिनिर्वाण दिन संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अंबादास कुलट हे होते. प्रमुख वक्ते म्हणून डॉ. एम. आर. इंगळे, माजी वाणिज्य विभाग प्रमुख हे होते. यावेळी विचारपीठावर मानवविद्या शाखा प्रमुख डॉ. नाना वानखडे, वाणिज्य शाखा प्रमुख डॉ. संजय तिडके, गृहविज्ञान शाखा प्रमुख डॉ. अंजली कावरे उपस्थित होते.
डॉ. एम. आर. इंगळे म्हणाले की, ‘भारतीय संविधानाने धर्म-उपासना व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य दिले आहे. हे आपल्या वैयतीक जीवनयापनासाठी योग्य आहे परंतु सार्वजनिक जीवनामध्ये आम्ही भारतीय असतो. बाबासाहेब म्हणायचे मी प्रथमता व अंतिमतः भारतीय आहे.’ अशा शब्दात त्यांनी आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन गीत संगीत विभागाचे डॉ. मानकर सर आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. पाहुण्याचा परिचय व प्रास्ताविक डॉ. संजय तिडके यांनी करून दिला. तर संचालन मयूरी हिने तर आभार प्रदर्शन प्रा. सचिन भूतेकर यांनी केले. कार्यक्रमाला डॉ.आशिष राऊत,डॉ.संजय पोहरे, डॉ. श्रद्धा थोरात, डॉ.गजानन वजीरे, डॉ.दीपक वानखडे, डॉ.संतोष बदने, प्रा.जमीर, डॉ. मिलिंद बेलखेडे आदी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विधार्थी उपस्थित होते .