मुलींची राज्य स्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा संपंन्न..
अकोला-क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय मुलिच्या बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेचे आयोजन स्वर्गीय वसंत देसाई स्टेडियम अकोला येथे दिनांक 01 ते 5डिसेंबर 2023 या कालावधीत करण्यात आले असुन या स्पर्धेकरिता संपूर्ण महाराष्ट्रातील 9 विभागातून १७ व १९ वर्ष वयोगटात एकुन मुली व २६० मुलींनी सहभागी नैदविला.या स्पर्धैत १७ वर्ष वयोगटात अकोला तर १९ वर्ष वयोगटात मुबंई संघ प्रथम स्थान पटकावले तर अकोला क्रीडा प्रबोधिनीने राज्यातुन सामुहिक विजेता प्राप्त करित एकुण ८ स्वर्ण पदकावर कब्जा जमावला. यात सुवर्ण पदकाची मानकरी अकोलाची रुणाली रवींद्र डोंगरे ही ठरली. ती आपल्या यशाचे श्रेय तिचे आई वडील आणि प्रशिक्षक सतीशचंद्र भट यांना देते.
सदर स्पर्धैस बक्षिस वितरण समारोहास. प्रमुख पाहुणे म्हणून विधानपरिषद सदस्य वसंत खंडेलवाल याचे हस्ते ट्राफी,मेडल,प्रमाणपत्र देऊन सम्मानित करण्यात आले.
सदर स्पर्धा ह्या जिल्हा क्रीड़ा अधिकारी सतीशचंद्र भट याचे मार्गदर्शनात होत असुन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी , वंदना पिंपळखरे डॉ. अर्चना भट. कार्यक्रमाचे उद्घाटन गणेश वंदना करण्यात येऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. गणेश वंदनाचे प्रात्यक्षिक डॉ. अर्चना भट जिल्हा क्रीडा कार्यालयातील श्रीमती मनीषा ठाकरे, महेश पवार,अमित दातकर, राधाकिशन ठोसरे, प्रशांत खापरकर, दीपक व्यवहारे, राजे उगवेकर, निशांत वानखडे, गजानन चाटसे, अजिंक्य धेवडे, अशोक वाठोरे, तसेच उदय हातवळणे, वैभव देहलिवाले, अनिल कांबळे विशाल कोथळकर, रोहीत वाघरोल्लू, ऋतिक जगदाळे, अनुप वर्मा हे परिश्रम घेत आहेत सदर स्पर्धैस विभाग स्तरावरुन पंच बोलाविण्यात आले आहे तसेच खेळाडूंच्या जेवणाची उत्तम व्यवस्था ही आयोजकाकडून करण्यात आली यासाठी खेळाडू,व्यवस्थापक व पालक वर्ग यांनी समाधान व्यक्त केले आहे.