स्थानिक: अमरावती परिक्षेत्रीय पोलीस कीडा स्पर्धा २०२३ चे दिनांक २४ नोव्हेंबर रोजी मा. विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती परिक्षेत्र अमरावती, श्री. जयंत नाईकनवरे यांचे शुभ हस्ते पोलीस मुख्यालय येथे उदघाटन संपन्न…
अमरावती परिक्षेत्रीय पोलीस कीडा स्पर्धा २०२३ चे या वर्षीचे आयोजन दिनांक २३नोव्हेंबर ते दिनांक २७ नोव्हेंबर २०२३ या कालावधीमध्ये अकोला पोलीस दला तर्फे करण्यात आले आहे. दिनांक २४नोव्हेंबर सकाळी १०.०० वाजता मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र, अमरावती श्री. जयंत नाईकनवरे यांचे शुभ हस्ते झाले. पोलीस मुख्यालय, अकोला येथे औपचारीक उदघाटन करीता मान्यवरांचे आगमन होऊन त्यांना मानवंदना देवुन त्यानंतर खेळाडूंचा शपथ विधीचा कार्यक्रम संपन्न झाला.
सदर क्रीडा स्पर्धा करीता अमरावती परिक्षेत्रातील अमरावती शहर, अमरावती ग्रामीण, यवतमाळ, वाशीम, अकोला, बुलडाणा येथील पोलीस खेळाडु सहभागी होणार आहेत.त्यामध्ये हॉकी, फुटबॉल, कबडडी, व्हालीबॉल, बास्केटबॉल, खो-खो, हॅन्डबॉल, अर्थलेटीक्स, जलतरण, बॉक्सींग, कुस्ती, ज्युदो, वुशु, वेटलीप्टींग असे वैयक्तीक व सांघीक खेळ खेळल्या जाणार आहेत. सदर स्पर्धेचे नियोजन करण्याकरीता मा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, अकोला यांचे मार्गदर्शनाखाली विविध समित्या तयार करण्यात आल्या असुन दिनांक २७ नोव्हेंबर रोजी अमरावती परिक्षेत्रीय पोलीस कीडा स्पर्धा २०२३ चा समारोपीय सोहळा होणार आहे.