अकोला लोकसभा मतदार संघातील बाविस हजार मतदार मतदान हक्कापासून वंचीत..

स्थानिक:
अधिनियम 1949 कलम 32 नुसार (मूलभूत हक्क / मतदान) असतांनी जाणीवपूर्वक वस्त्याबदल करून बाविस हजार मतदार वंचित असून पुन्हा सर्वेक्षण करून त्यांना मतदानाचा हक्क देणे व वि.एल.ओ. वर कारवाई करणे बाबत वंचित बहुजन आघाडी ने निवेदन दिले.

सन 2024 मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणूक मध्ये अकोला लोकसभा मतदार संघातील जवळपास 22 हजार मतदान वगळण्यात आले. विशेषता सदर मतदार हे स्लम एरियातील व उच्चवर्णिय वस्तीतील आहे. आणि ही जी नांवे वगळण्यात आलेले ही जाणीवपूर्वक वगळण्यात आले. वि.एल.ओ. हे सत्ताधारी राजकीय पक्षाच्या दबावात येऊन आपल्या सोयीप्रमाणे करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच या वस्तीतील मतदार हा दुस-या वस्तीत टाकून त्याला दिशामुल करित असल्याने मतदार हा त्यांच्या मतदान करण्याच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न बि.एल.ओ. ला हाताशी धरून काम करित आहे. तसेच बि.एल.ओ. मतदान अधिनियम 1949 कलम 32 नुसार (मुलभुत हक्क / मतदान नुसार) जाणीवपूर्वक वस्त्याबदल करून बाविस हजार मतदार वंचित ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. बि.एल.ओ. मतदारांना प्रत्यक्ष न भेटता एका ठिकाणी बसून तसेच घराला लॉक असल्याचे दाखवून किंवा इतर कारणे दाखवून त्यांना वगळण्याचे काम बि.एल.ओ. यांनी केलेले आहे असे आमच्या निर्देशनात आले. सरू असलेली प्रक्रीया हि जाणीवपुर्वक आहे. तरी सर्व बि.एल.ओ. यांना आपण प्रत्यक्षात बोलावून झालेल्या सर्वेक्षणाचे निरीक्षण करून त्यांना विचारणा केली असता आपल्या समोर हि गंभीर बाब समोर येईल. अशी माहिती वंचित बहुजन आघाडी ने दिली.

त्वरीत बाविस हजार मतदारांचे पुन्हा सर्वेक्षण करून ज्याच्या त्या वस्त्यामध्ये त्यांचे नांवे समाविष्ट करण्यात यावे अन्यथा वंचित बहुजन आघाडी अधिनियम 1949 कलम 32 नुसार (मुलभूत हक्क / मतदान) मा. न्यायालयात दाद मागून तिव्र आंदोलन फेडण्यात येईल असा इशारा दिला.

तेव्हा प्रमोद देंडवे जिल्हाध्यक्ष, मिलींद इंगळे जिल्हा महासचिव,
मनपा गटनेते गजानन गवई, सह जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विकास सदांशिव, रुग्ण कल्याण समिती सदस्य नितीन सपकाळ, पक्षीराज चक्रनारायण आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.