
चोंढी दि.१६/११/२०२३ रोजी महात्मा फुले विद्यालयाच्या प्रांगणात क्रांतीसूर्य विर बिरसा मूंडा यांच्या १४८ जयंती निमित्ताने महिलांच्या भव्य क्रिकेट सामण्यांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या सूरवातीला महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. Cmrc च्या सहयोगीनी सौ.वंदनाताई ठाकरे यांच्या सक्रीय सहभातून अनेक महिला संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला. अतिशय खेळीमेळीने आनंदमय वातावरणात स्पर्धा पार पडली.

स्पर्धेत राणी लक्ष्मीबाई संघाने तृतिय क्रमांक,क्रांतीज्योती सावित्रीमाई फूले संघाने द्वितीय क्रमांक तर माता रमाई संघाने प्रथम क्रमांक पटकावला. वरील क्रमांकाला अनूक्रमे मा.संतोष ठाकरे सर,मा.सूरेश खूळे सर ,सौ.अंतकलाताई संजय ठाकरे, आणि चोंढी गावच्या सरपंच सौ.लक्ष्मीताई विष्णू ठाकरे यांच्या कडून बक्षिसे देण्यात आली. मा.संतोष पस्तापूरे सर,निलेश ताजने, नारायण ठाकरे, समाधान ताजने,ह्यांनी पंच म्हणून कार्य केले. रोहन ताजने,स्वप्नील ताजने, निखिल ताजने ह्यांनी खेळाचे व्यवस्थापन केले.व समस्त गावकर्यांनी प्रेक्षक बनून खेळाचा आनंद घेतला. शेवटी आभार प्रदर्शन करून कार्यक्रम पार पडला.