जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह’
अकोला : शिवाजी महाविद्यालय, येथील मानसशास्त्र विभागाचे पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी ‘जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह’ निमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अंबादास कुलट यांच्या मार्गदर्शनात अकोल्यातील ज्योती नगर,जठारपेठ येथील एकविरा मल्टीपर्पज फाऊंडेशन अंतर्गत चालवीत असलेल्या लहान मुलांच्या अंध व मूकबधिर शाळेस भेटीचे आयोजन करण्यात आले होते.
अभ्यासक्रमाचा एक भाग व लहान मुलांमधील आजार ADHD, Autism म्हणून डॉ.चेतन राऊत व डॉ. संतोष पस्तापुरे यांच्या नेतृत्वाखाली जवळपास 35 विद्यार्थ्यानी सहभाग नोंदविला. या भेटीच्या आयोजनामध्ये आपल्याच महाविद्यालयाचे संगीत विभागाचे प्राध्यापक डॉ. विशाल कोरडे यांची मोलाची मदत मिळाली व प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. वेगवेगळया अंध विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून लहान मुलांमधील (ADHD, Autism) आजाराबद्दल माहिती जाणुन घेतली. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ.श्रीकांत बनसोड यांनी अंध व मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना मानसिक आधार देणे ही एक आजच्या काळाची गरज असून ती गरज पूर्ण करण्याचे काम आम्ही अविरत 15 वर्षापासून करत असून समाजाने याकडे बघण्याचा डोळस दृष्टिकोन ठेवावा असे मत व्यक्त केले. ज्या घरात कर्नबधिर व मूकबधिर विद्यार्थी जन्मास येतो त्या घरातील पालकांची मानसिक स्थिती जाणून घेऊन त्यांना मानसिक व भावनिक दृष्ट्या आधार देण्याचे काम आमचे फाउंडेशन करीत आहे. आमच्या या शाळेमध्ये जवळपास 30 ते 40 विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम केले जात असून त्यामध्ये श्रवणदोष तपासणी ,भाषा उपचार पद्धती, दिव्यांग बालकांचा विकास व पालकांचे समुपदेशन इत्यादी मार्गदर्शन करण्यात येते. जन्मलेल्या नवजात बालकाचे जन्मल्यानंतर 72 तासाच्या आत मूकबधिर व कर्णबधिर मोफत तपासणी आमच्या येथे केली जाते त्याचा समाजातील सर्व घटकांनी लाभ घ्यावा असे आव्हान केले भविष्यात त्यांच्या व्यक्तिगत जीवनात व सामाजिक जीवनात अंधत्वामुळे व अपंगात्वामुळे जी अडचण निर्माण होईल त्याची निर्मूलन करण्याचे काम आम्ही करीत आहोत. कर्णबधिर विद्यार्थ्याना समजून घेऊन सहानुभूती पूर्वक इयत्ता चवथी पर्यंत सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य आमची संस्था करीत आहे.
यावेळी मानसशास्त्र विषयाचे शशिकांत सदांशिव,तुषार चव्हाण , एकता शिरसाट, अजय वैराळे,विशाल गोलाईत,तुषार चव्हाण, सोमेश अवचार, कांचन अवचार, अरविंद अंभोरे, वैभव आगलावे, वैष्णवी काकडे,निशा हिवराळे, हर्षाली काकडे,जरीना शेख, महक, मोहम्मद समी, शेख तालीब हुसेन,रिंकू मेश्राम, तृप्ती बिहाडे, श्रुती बुडाखले, श्रेया फाले, दर्शना रत्नपारखी, प्रमोद सातव, विकास चव्हान, आदित्य वहिले, विट्ठल,पूजा खिल्लारे, कल्पना तिखिले, जोत्सना, प्रणव तायडे, समुद्रे, इत्यादी विदयार्थी उपस्थित होते. असे मानसशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. संतोष पस्तापुरे यांनी कळविले आहे.