महामानव युथ फाऊंडेशन तर्फे मिरवणुकीचे आयोजन.
अकोला/ प्रतिनिधी:
दि. २९ ऑक्टोंबर २०२३ रोजी स्थानिक अशोक नगर, अकोट फाईल येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण वंचित बहुजन आघाडीचे कार्यकारी अध्यक्ष मजहर खान चांद खान,महासचिव गजानन गवई, सचिव मंगेश बलखंडे, प्रबुद्ध भारत अकोला प्रतिनिधी प्रतुल विरघट यांच्या हस्ते करण्यात आले. मिरवणुकीची सुरवात बुद्ध वंदना घेऊन करण्यात आली.यावेळी संपूर्ण अशोक नगर, अकोट फाईल मधील हजारो पुरुष, महिला, युवक,युवती हजर होते. ढोल ताशे व बँड च्या गजरात संत कबीर नगर येथून चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या पुतळ्याची मिरवणूक अकोट फाईल, शिवाजी पार्क, सिटी कोतवाली बस स्टँड मार्गे अशोक वाटिका येथे भारतीय बौध्द महासभा चे जिल्हाध्यक्ष जे. पी. वानखडे सर व भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मिरवणुकीचा समारोप अशोक वाटिका येथे करण्यात आला.
यावेळी रुग्ण कल्याण समिती सदस्य नितीन सपकाळ यांच्या सहकार्याने १०८ रुग्णवाहिका व डॉकटर याचा चमू यांची उपस्थिती लाभली.मिरवणुकीच्या यशस्वीतेसाठी अंकुश बलखंडे, सुयोग इंगोले, चिकू लोंढे,रोहीत मोरे, जयंत सदाफुले, निखिल जोंधळे, संगीत जावळे, आनंद ओवे, आशिष जावळे, अनिश गायकवाड, रुपेश शास्त्री,सुमित धाडसे, अक्षय वाघमारे, ऋतिक बलखंडे, प्रसेनजीत विरघट यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.