अकोला : शहरातील आॅटोचालकांसह दुचाकीस्वारांना दंड आकारण्याचा मनमानी कारभार शहर वाहतूक शाखेने सुरु केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. अकोला शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी वाहनधारकांना न थांबवता चक्क चालत्या वाहनांचे फोटो काढून आॅनलाइन दंड आकारला जात असल्याचा प्रकार सुरु आहे. शहर वाहतूक शाखेने सुरु केलेला हा मनमानी कारभार थांबविण्याच्या मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडी अकोला महानगर पश्चिमच्या वतीने वाहतूक शाखेचे निरीक्षक किनगे यांना देण्यात आले.
निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महानगर कार्याध्यक्ष हाजी मजहर खान, महानगर महासचिव गजानन गवई, उपाध्यक्ष सैय्यद अलीमुद्दीन, ऑटो संघटना अध्यक्ष कमरुभाई, महेंद्र डोंगरे, रणजीत वाघ, गजानन दांडगे, अक्रम कुरेशी, विश्वजीत तायडे, शाहिद खान, जुनेद मंजर, सोहेल खान, विनय हिवराळे, संजय किर्तक, विनोद इंगळे, ज्ञानेश्वर गवई, प्रमोद वाकोडे यांच्यासह वंचित बहुजन आघाडी अकोला महानगर पश्चिमचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि आॅटोचालक उपस्थित होते.