मनात जे साचलं आहे ते व्यक्त करता आलचं नाही तर – प्रा. डॉ. संतोष पस्तापुरे

अहो, सांगा ना मला साचलेल्या डबक्यातअसलेले पाणी चांगलं की खळखळ वाहत पाणी चांगलं! त्याचं उत्तर नक्की तुम्ही मला खळखळ वाहत पाणी चांगलं असच देणार. त्याचप्रमाणे आपल्या मनाच आहे .मनामध्ये असंख्य विचारांचा काहूर उठला असेल तर ते मन विचलित होतं.त्याचा विपरीत परिणाम आपल्या मानसिकतेवर व शरीरावरही होतो.मन आणि शरीर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मनाचा परिणाम शरीरावर तर शरीराचा मनावर परिणाम होत असतो. जीवन जगत असताना प्रत्येक गोष्टी कळत नकळत आपल्याशी घडून जातात, त्या प्रत्येक गोष्टीचा आपल्या मनावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होत असतो.’बालपण देगा देवा’ ह्या म्हणीप्रमाणे बालपण हे खळखळत्या पाण्याप्रमाणे निर्मळ,निर्भिड असतं. ह्या वयात मनावर कुठल्याही प्रकारचे विपरीत परिणाम होत नसतात.तरी सुध्दा बालहट्ट हा या वयातील मुलांना असतोच त्यांच्या मनात हट्टीपणा ,जिद्दिपणा असल्यामुळे आई-वडिलांकडून मुलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष झालं तर त्याचे म्हणणे ऐकून घेतले नाही तर ते सर्व गोष्टी मनातच साठून ठेवायला लागतात. याचमुळे बालकांमध्ये मानसिक आजार जडू शकतात.कारण ते ज्यांच्यावर अवलंबुन आहेत तेच त्यांचा भावनांची कदर करत नाहीत समजुन घेत नाहीत असा गैरसमज त्यांच्यामध्ये निर्माण होतो व ते एकाकी पणाकडे वळतानां आपणास दिसून येतात. यालाच मानस शास्त्रीय भाषेत पालकत्वाचा अभाव असे आपणास म्हणता येईल.कारण बालके ही आपल्या पालकांवर अवलंबुन असतात. आजच्या धकाधकीच्या युगामध्ये कामामध्ये व्यस्त असलेली पालक हे बालकांकडे लक्ष देण्यास असमर्थ ठरतात त्यामधून बालकांना अनेक मानसिक आजार जडण्याची खूप दाट शक्यता असते. बालकांमध्ये जिद्दीपना हट्टीपणा असेल तर नकारात्मकतीने रागावून त्यांच्यामधील या गोष्टीचा पण नष्ट करू शकत नाही. तर आपल्या बुद्धीने आणि त्यांच्या कलाने आपण निश्चितच त्यावर मात करू शकतो ही जाण पालकांना असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.बालकांमधील आजार खालील प्रमाणे:- 1. ऑटिझम स्वमग्नता (autism) 2. विसरभोळेपणा 3. शैक्षणिक आजार (Learning disorder) A. डीस्लेक्सिया:- वाचन संबंधी विकार riding disorder B. डीसग्राफिया :- लेखन संबंधी विकार writing disorder C. डिसकॅल्क्युलिया:- गणना संबंधी विकार calculation disorder D.डीस्प्रेक्सिया :-वाचन संबंधी विकार riding disorder,लेखन संबंधी विकार writing disorder,गणना संबंधी विकार calculation disorder E. डीस्थिमिया:- तणाव संबंधी विकार stress related disorder F. डिस्मोरफिया:-दुसऱ्यापेक्षा स्वतःला ताकदवर समजणे G. अफेजिया:-भाषा संप्रेषण संबंधी विकार H. बुलीमिया:-जेवणा संबंधी विकार I. प्रोजेरिया:-कमी वयात वृद्धावस्था चे लक्षण J. डीमेंसिया:-तर्क करण्यास असमर्थ असणे इत्यादी प्रकारचे आजार मुलांमध्ये होण्याची शक्यता असते. त्यामुळे मुलं काय म्हणतात ते ऐकून घेणे त्यावर त्यांना योग्य सल्ला व मार्गदर्शन करणे हे प्रथम आणि आद्य कर्तव्य पालकांचे असते. जाणीवपूर्वक लक्ष देऊन मुलं काय म्हणतात त्यांच्या काय समस्या आहे त्यांना कुठल्या अडचणी येत आहेत यावर लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे.

“दिवस तुझे फुलायचे झोपाळ्या वाचून झुलायचे”हा काळ म्हणजे कुमार अवस्था होय. याच कालावधीत मुलांचा शारीरिक व तसेच लैंगिक विकास होत असतो. मुलांमध्ये व मुलींमध्ये आणि शारीरिक बदल घडून येत असतात त्या बदलांची माहिती करून देणे व तसेच त्यांच्यामध्ये घडून येणाऱ्या बदलांचे काळजीपूर्वक निरीक्षण करून आईने मुलीला व वडिलांनी मुलांना मनात कुठलाही संकोच न ठेवता त्यांचे मित्र म्हणून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे हे या वयात अत्यंत आवश्यक असते. हा काळ त्यांच्यासाठी संभ्रम अवस्थेचा काळ असतो ह्या काळामध्ये मुलं आई-वडिलांपासून हळूहळू दूर होत जाऊन मित्र-मैत्रिणींमध्ये आपल्या समस्यांची देवाण-घेवाण करीत असतात. याच वयामध्ये विरुद्ध लिंगी आकर्षण सुद्धा वाढीस लागलेली असते. विशेषता करून मुलींमध्ये मासिक पाळी ही वयाच्या बाराव्या ते तेरावे वर्षापासून सुरू होत असते. ह्या या समस्येबद्दल आईने आपल्या मुलीला मैत्रीण म्हणून समुपदेशन करणे अत्यंत आवश्यक असते. ह्याच काळात अनेक लैंगिक बदल घडून येत असल्यामुळे त्यांच्या मनात अनेक प्रश्न असतात त्या प्रश्नांची उकल होणे अत्यंत आवश्यक असते. बरेच वेळ आपली मुले आई-वडिलांची या मनात निर्माण झालेल्या समस्यांचा मांडणी करण्यास असमर्थ ठरले असतील तर त्यांना भविष्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते सोबत गुण संगत गुण अशा मनी प्रमाणे त्यांनी आपले विचार इतरांजवळ व्यक्त केले असता समोरील व्यक्तीकडून योग्य ते मार्गदर्शन मिळाले नाही तर त्या मुला-मुलींना त्याचा खूप मोठे नुकसान होऊ शकते याची काळजी आई-वडिलांनी घेणे खूप गरजेचे असते.

ह्याच काळात मुले मुली मित्र-मैत्रिणींसोबत राहणे त्यांच्यासोबत सर्व गोष्टीची देवाण घेवाण करणे पसंत करीत असतात .त्यामध्ये काहींना चांगल्यांचा सहवास लाभतो तर काही वाईटांच्या सहवासातही जात असतात. याकडे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आजच्या या मोबाईल युगामध्ये तरुण-तरुणींमध्ये विरुद्ध लिंगी आकर्षण हा एक मोठा मानसिक परिणाम झालेला अनुभवास येत आहे. या वयात मुले मानसिकतेने परिपक्व नसल्यामुळे त्यांच्यामध्ये अनेक समस्या निर्माण होत असतात. आजकाल तर प्रेम ही एक गोष्ट खूप मोठ्या प्रमाणावर आपणास बघावयास मिळत आहे. त्यातून दोघांमध्ये काही वाद निर्माण झाल्यास एकमेकांपासून विलग झाल्यास नैराश्य, उदासीनता निर्माण होऊ शकते. तसेच एकमेकांपासून दूर होण्याची भावना वाढीस लागते व त्यातून काही वेळा आत्महत्येचे प्रकार सुद्धा आपल्या समोर प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आलेले आहेत.तरुण-तरुणींना मैत्री करीत असताना काळजीपूर्वक करणे विचार करून करणे आवश्यक असते एखाद्याबद्दल आपल्या मनात गैरसमज निर्माण झाला असेल तर त्या व्यक्तीबद्दल अधिक विचार न करता तो गैरसमज त्याच्याशी थेट संवाद साधून दूर करणे अत्यंत महत्त्वाचे असते. गैरसमजातून नकारात्मक भावना वाढीस लागून मानसिक विकार जडण्याची खूप दाट शक्यता असते. ज्यावेळी जी समस्या आपल्यासमोर निर्माण झालेली आहे त्या समस्येची सोडून सकारात्मक भाव ठेवून समोरच्या व्यक्तीशी हितगुज करून त्याचे निरासरन करणे खूप महत्त्वाच्या आहे. शिक्षण घेत असताना अनेक अडचणी आपल्यासमोर निर्माण होत असतात त्या अडचणींवर मात कशी मिळवायची याचा अभ्यास तरुणांना करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आज-काल तरुण मंडळी ही मोबाईलच्या अतिवापराने सुद्धा आपल्या लक्षापासून विचलित होत आहे. याकडे मात्र कोणाचेच लक्ष नाही. व्हाट्सअप, इंस्टाग्राम ,फेसबुक ,ट्विटर, तींडर, स्नॅपचॅट ,ट्विटर ,इत्यादी अनेक गोष्टींचा अधीन झाला असून तासंतास गमावल्यानंतर आपली आजची वेळ निघून गेली त्यावर विचार करीत बसतो व त्यातून अनेक मानसिक आजार जडण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून या वयात निर्माण होणाऱ्या ताण, तणाव, नैराश्य, चिंता यासारख्या आजारांपासून दूर राहायचे असेल तर आपल्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या अनेक समस्यांची हितगुज करून सोडवणूक करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मनात साचलेल्या प्रत्येक गोष्टी व्यक्त होणे अत्यंत आवश्यक आहे. मग त्या मित्र मैत्रीण,आई वडील ,भाऊ बहिण आपल्या अत्यंत जवळची व्यक्ती व तसेच समुपदेशक यांच्या कडे मन मोकळे करावे. कोण काय म्हणेल याचा विचार न करता आपल्या मनातील सर्व गोष्टी व्यक्त करून मन मोकळे करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.”बाबा लगीन ढिंच्याक ढिंच्याक ढिंग”हा काळ म्हणजे आपल्या जीवनातील तिसरा आणि महत्त्वाचा टप्पा समजला जातो यालाच प्रौढ अवस्था असे म्हटले जाते. याच काळात शैक्षणिक टप्पा ओलांडून स्वतःच्या पायावर उभे राहणे म्हणजेच स्वतःचं अस्तित्व निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे असते. परंतु आजच्या या आधुनिक काळात बेरोजगारी खूप भयानक व त्रिकाल बाधित सत्य असणारी बाब आहे. ह्या वयात व्यक्ती स्वतःच्या अर्थार्जनाची साधन शोधत असतो त्याचबरोबर भारतीय हिंदू संस्कृती प्रमाणे हेच वय लग्नाचे असते. त्यामुळे वैयक्तिक, सामाजिक, कौटुंबिक,वैवाहिक जबाबदाऱ्या सांभाळण्याचा हा काळ असतो.ह्याच काळात सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असताना अनेक अडचणी येतात त्याचा विपरीत परिणाम आपल्या मानसिकतेवर होऊ नये याची खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

लग्नानंतरच्या अनेक पती पत्नितील वाद निर्माण झाल्यास एकमेकांपासून वेगळं न होता त्यावर विचार करून योग्य सल्ला मसलत करुन आपल्या मनात जे गैरसमज निर्माण झाले आहेत त्याचे निर्मुलन करावेत.आजच्या आधुनिक काळात love marriage, केलेल्या जोडप्यांमध्ये अनेक वाद निर्माण होत आहेत त्याला कारणीभूत आहे Ego.जीवन जगत असताना Ego ला बाजूला ठेऊन दोघांनीही एकमेकांना आधार देत निर्माण झालेल्या समस्या मन मोकळं करून सोडवाव्यात.विभक्त कुटुंबपद्धती ही सुद्धा वाढीस लागलेली असल्यामुळें त्याचे सुध्दा विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे मन मोकळं करण्यास वाव मिळत नाहीये.ह्या वयातील स्त्री पुरुष मंडळीनी इगो Ego बाजुला ठेऊन मनातील राग, व्देष, बोलुन मन मोकळं करावे. डबक्यात साचलेल्या विचारांची वाट मोकळी करून द्यावी. जेणेकरून आपण मानसिक आजारास बळी पडणार नाहीत याची कुटुंबातील सर्व सदस्यांनी काळजी घ्यावी.वृद्धावस्था व्यक्ती जीवनातील हा काळ सर्वात महत्त्वाचा असतो. त्याच काळाला वैराग्याचा काळ असे म्हटले जाते .सुख, समाधान, तृप्ती या काळात वरील तिन्ही टप्प्यातून गेल्यानंतर मिळालेली असते तरीपण ज्याप्रमाणे लहान बाळाचे संगोपन आपल्या आई वडील करीत असतात त्याचप्रमाणे साठ वर्षावरील स्त्री-पुरुषांचे संगोपन आपल्या पाल्यांनी करावे हे अत्यंत गरजेचे आहे. परंतु आज या कलियुगात तसे क्वचितच आढळते शिक्षण आणि नोकरीच्या नावाखाली आपले मुले आपल्या आई-वडिलांना एकटा सोडून नोकरीच्या ठिकाणी वास्तव्यास राहतात. काही तर ठिकाणी आई-वडिलांना अक्षरशा वृद्धाश्रमात राहावे लागते. हा काळ खरंतर त्यांना आधार देण्याचा असतो. शारीरिक अवयव थकलेले असतात मानसिकतेने ते काही करण्यास असमर्थ असतात फक्त पैसा असून चालत नाही तर या काळात व्यक्तीला प्रेम, आपुलकी, जिव्हाळा माया व तसेच त्यांचे मन रीत करण्यासाठी आपल्या पाल्यांची त्यांना नितांत आवश्यकता असते.

या काळात जरी ते पैशाने परिपूर्ण असतील तरी त्यांना मायेची फुंकर घालणारा प्रेमाने आपुलकीने वागणारा त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारा त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करणारा सहवास हा अत्यंत महत्त्वाचा असतो या सहवासाची त्यांना खूप गरज असते. जर या काळात त्यांना एकाकी पणाने राहावे लागत असेल तर अनेक मानसिक आजारांची लागण त्यांना होऊ शकते. मन रीत करणे त्याचबरोबर मनातील भावनांना व्यक्त करणे यासाठी या वयातील स्त्री-पुरुषांना आपले मुले मुली, नातवंड सोबत असणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. खरं जर विचार केला ना तर त्यांना तुमच्या सहवासा व्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीची मागणी नसते. तुमच्या सुखदुःखात सदैव तत्पर असतात. त्यांना फक्त गरज असते आपुलकीची ,प्रेमाची, जिव्हाळ्याची, मदतीची. ह्या काळात जर आपण आपल्या आई-वडिलांना एकटं सोडलं तर भावना व्यक्त करण्यासाठी कोणीच उरणार नाही त्यातून त्यांच्या मनातील भावभावना ह्या मनातच राहतील म्हणजेच डोक्यात साचलेलं विचार हे डबक्यात साचलेल्या पाण्याप्रमाणेच गढूळ होतील त्यातून अनेक मानसिक आजारांची लागण होण्याची शक्यता असते. ह्या वयातील स्त्री-पुरुषांना विसरभोळेपणा ,चिंता, नैराश्य, ताण -तणाव असे अनेक आजार जडण्याची खूप दाट शक्यता असते.सरते शेवटी असेच सांगावेसे वाटते आपण लहान बाळ असो , तरुण असो , प्रौढ असो किंवा वृद्ध असो मनातील भावनांना प्रत्येक जीवनातील टप्प्यावर मोकळं करता आलं पाहिजेत विचार मांडले पाहिजेत हितगुज करता आलं पाहिजेत, समजून घेता आलं पाहिजे जेणेकरून आपल्या मनातील आपल्या डोक्यातील विचार हे कुजणार नाहीत डबक्यातील पाण्याप्रमाणे गढूळ होणार नाहीत याची आई वडिलांनी आपल्या मुलाप्रती, तरुण मुला-मुलींनी आपल्या मित्र-मैत्रिणी प्रति, विवाहित जोडप्यांनी आपल्या जोडीदाराप्रती, वृद्धावस्थेतील स्त्री-पुरुषांनी आपल्या कुटुंबाप्रती काळजी घेणे व कुठलाही संकोच न करता,कोण काय म्हणेल याचा विचार न करता मनातील भावनांना मोकळीक करणे, व्यक्त करणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. म्हणून मी म्हणतोय “मनात जे साचलं ते व्यक्तच करता आलं नाही तर”

प्रा.डॉ. संतोष उमाकांत पस्तापुरे

मानसशास्त्र विभाग श्री शिवाजी आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज,अकोला

एम. ए. समाजशास्त्र, मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र, समुपदेशन आणि मानसोपचार बी. एड.(डी. एन. वाय. एस)

Leave a Reply

Your email address will not be published.