स्थानिक: अकोट येथील सिंध नवयुवक मंडळाचे शिवभक्त गांधीग्राम पूर्णा नदी पात्रात पवित्र जल घेऊन येताना मालवाहू वाहनाने शिवभक्तांना धडक दिली. अपघातात अजय मनोहर मोटवानी याचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन पर भेटी साठी वंचित बहुजन युवा आघाडी नेते सुजातदादा आंबेडकर, युवा प्रदेश महासचिव राजेंद्रभाऊ पातोडे जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, महासचिव राजकुमार दामोदर आले होते.
ह्या वेळी मोटवानी परिवाराचे सांत्वन करताना अपघात प्रकरणी जबाबदार पोलीस बंदोबस्त मधील हलगर्जी कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला.त्यानंतर दहीहंडा पोलीस ठाणेदार ह्यांना तातडीने गुन्हे नोंदवून पुढील कार्यवाही बाबत मोबाईल वरून सूचना सुजात आंबेडकर यांनी दिल्या तसेच जाताना सोबत वंचित चे कार्यकर्ते पाठवण्याची जबाबदारी स्थानिक युवा आघाडीचे पदाधिकारी ह्यांना दिली.शिवभक्तांच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री सहायता निधीतून मृत्यू झालेल्या शिवभक्ताच्या कुटुंबाला करावी अशी अपेक्षा देखील सुजात आंबेडकर ह्यांनी व्यक्त केली.ज्या वेळी आनंद खंडारे,श्रीकृष्ण देवकुनबी, मीनल मेंढे, प्रशिक मोरे, अकोट तालुकाध्यक्ष मयूर सपकाळ,कार्याध्यक्ष आशिष रायबोले, सचिन सरकटे,मिथुन भारसाकळे, गौरव सुरत्ने व युवा आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.